JP Nadda Corona Positive: संरक्षणमंत्र्यानंतर भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा कोरोना पॉझिटिव्ह

j.p.nadda

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या पाठोपाठ भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सुरूवातीला लक्षणं असल्याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती. परंतु यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांनी स्वत:ला आयसोलेशन केलं आहे

सुरूवातीला लक्षणं असल्याची जाणीव झाल्यानंतर मी कोरोना चाचणी केली होती. परंतु माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परंतु आता मला बरं वाटतंय. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी स्वत:ला आयसोलेशन केलं आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी, अशी सर्वांना विनंती करतो, असं ट्विट जे.पी.नड्डा यांनी केलं आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यानंतर जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नड्डा यांच्याआधी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा सुद्धा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर केंद्रीय मंत्री अजय भट्ट यांना कोरोनाची लागण झाली आहे.


हेही वाचा :महाराष्ट्राप्रमाणे गोवा राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यास काँग्रेस पक्ष अनुत्सुक – संजय राऊत