घर देश-विदेश भाजपने राहुल गांधीचे आरोप फेटाळले; काँग्रेसने चीनसोबत केलेल्या कराराची करून दिली आठवण

भाजपने राहुल गांधीचे आरोप फेटाळले; काँग्रेसने चीनसोबत केलेल्या कराराची करून दिली आठवण

Subscribe

मागील काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी लेह-लडाखच्या दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर चीनने आपल्या देशात घुसखोरी केली असल्याचा आरोप करीत पंतप्रधान याबाबत काहीच बोलत नसल्याचे म्हटले होते.

नवी दिल्ली : चीनने भारतात केलेली घुसखोरी आणि जमिन बळकावली असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी लडाखच्या दौऱ्यावर असताना केला होता. दरम्यान या आरोपांमुळे भाजप आक्रमक झाली असून, भाजपने राहुल गांधींनी केलेले आरोप निराधार आणि मूर्खपणाचे असल्याचे म्हणत फेटाळून लावले. तर कॉंग्रेसने बीजिंगशी व्यवहार करून ऐतिहासिक अक्षम्य गुन्हा केल्याचा दावा त्यांनी केला आहे. (BJP rejects Rahul Gandhi’s allegations; Congress reminded the agreement with China)

मागील काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी लेह-लडाखच्या दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर चीनने आपल्या देशात घुसखोरी केली असल्याचा आरोप करीत पंतप्रधान याबाबत काहीच बोलत नसल्याचे म्हटले होते. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप-विरुद्ध कॉंग्रेस असा सामना रंगला असून, आज भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधीनी केले आरोप फेटाळून लावले आहेत.

- Advertisement -

ही दिली आठवण करून

पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निवडक कामांचा दाखला देत सांगितले की, त्यांच्या सरकारने (काँग्रेस) 1952 साली उपाशी चिनी सैन्यासाठी 3,500 टन तांदूळ पाठवला होता. चिनी कम्युनिस्ट पक्षासोबत झालेल्या कराराचा अहवालही त्यांनी काँग्रेसला मागितला आहे. एवढेच नव्हे तर पुढे बोलताना त्रिवेदी म्हणाले की, जेंव्हा भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण वातावरण होते तेव्हा त्यांच्या सैन्यासाठी तांदुळ पाठवणे कितपत योग्य होते तेव्हा कॉंग्रेसने केलेल्या त्या अक्षम्य चुकीची आठवण करून दिली.

- Advertisement -

हेही वाचा : मृत्यूपूर्व जबानी विरोधात असली तरी सर्वोच्च न्यायालयाने दोषीला केले मुक्त, काय आहे प्रकरण?

राहुल गांधीही काहीही बोलत राहतात

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, राहुल गांधी चीनच्या घुसखोरीबाबत काहीही बोलत राहतात. ते फक्त चीनबाबतच नाही तर भारतीय नागरिकांविषयी आणि आरएसएसबाबतही ते काहीही बोलत रहातात. एवढेच नाही तर राहुल गांधी यांनी डोकलाम संकटावेळी चीनच्या राजदुतांशी भेटणे कितपत योग्य होते असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : राज्याच्या ‘या’ पाच जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता

कॉंग्रेसच्या काळात सर्वाधिक दहशतवादी हल्ले

सूधांशू त्रिवेदी यांनी यावेळी सांगितले की, भाजप सरकारवर आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्याच कॉंग्रेस सरकारच्या काळात सर्वाधिक दहशतवादी हल्ले झाले आहेत. मात्र, त्यावेळी कॉंग्रेस शांतीवार्ता करण्यास पुढे गेला नाही. मात्र आता मोदी सरकारच्या काळात दहशतवादी हल्ले कमी झाले आहेत.

- Advertisment -