घरदेश-विदेशआकाश विजयवर्गीय यांना भाजपची नोटीस

आकाश विजयवर्गीय यांना भाजपची नोटीस

Subscribe

आमदार आकाश विजयवर्गीय यांना महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याप्रकरणी भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आमदार आकाश विजयवर्गीययांचे यांना भाजपने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी आकाश यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ २६ जून रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आकाश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना अटक देखील करण्यात आली होती. तीन दिवसांनी त्यांना जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचे स्वागत केले. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयवर्गीय यांच्यावर नाराज

आकाश विजयवर्गीय यांचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ संपूर्ण देशभरात व्हायरल झाला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आकाश यांच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली होती. अशाप्रकारच्या कृत्याचे कधीही समर्थन केले जाणार नाही, असे मोदी म्हणाले होते. याशिवाय भाजपच्या इतर नेत्यांनी देखील या प्रकरणी आकाश यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर आकाश यांचे वडील कैलाश यांनी आपल्या मुलाच्या कृत्याचे असमर्थन केले होते. पक्षाने त्यांच्या विरोधात कारवाई करावी, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे. त्यामुळे भाजप आकाश यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -