घरताज्या घडामोडी'फसवेगिरीची सवय' असलेल्या नितीश कुमार यांचे राजकारण 2025ला संपेल; भाजपाची टीका

‘फसवेगिरीची सवय’ असलेल्या नितीश कुमार यांचे राजकारण 2025ला संपेल; भाजपाची टीका

Subscribe

बिहारमध्ये जेडीयूने भाजपा साथ सोडून राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार सरकार कोसळले आहे.

बिहारमध्ये जेडीयूने भाजपा साथ सोडून राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार सरकार कोसळले आहे. महाराष्ट्रात भाजापाने सत्तांतर घडवून आणले, परंतु बिहारमध्ये मित्र पक्षानेच साथ सोडल्यामुळे सत्तेतून भाजपाला पायउतार व्हावे लागले. त्यानंतर भाजपाने माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीकस्त्र सोडले. शिवाय “आपले जुने मित्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ‘फसवेगिरीची सवय’ आहे”, असा आरोपी भाजपाने केला आहे. तसेच, राष्ट्रीय जनता दलासोबतची त्यांची नवी युती बिहारला पुन्हा एकदा अराजकता आणि भ्रष्टाचाराच्या खाईत ढकलणार असल्याचेही भाजपाने म्हटले. (BJP Slams bihar former cm nitish kumar)

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या राज्य मुख्यालयात पक्षाच्या कोअर कमिटीची बैठकी झाली. या बैठकीनंतर भाजपाने एक निवेदन जारी केले. या निवेदनात जेडीयूने केलेल्या ‘विश्वासघाता’च्या विरोधात बुधवारी सर्व जिल्ह्यांमध्ये महाधरणे आयोजित करण्याची घोषणा भाजपा केली. तसेच, आंदोलनही केले जाणार असल्याचे म्हटले.

- Advertisement -

या संदर्भात भाजप खासदार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ट्विट केले असून, 2024 मध्ये भाजप प्रचंड बहुमताने जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. “भाजपने नितीश कुमार यांच्या संमतीशिवाय आरसीपी सिंह यांना मंत्री बनवले. भाजपला जेडीयू तोडायची होती किंवा ते तोडण्यासाठी निमित्त शोधत होता हेही खोटे आहे. 2024 मध्ये भाजप प्रचंड बहुमताने जिंकेल”, असे सुशील कुमार मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

नितीश यांचा पक्षाचे 1990 च्या दशकापासून भाजपासोबत संबंध आहेत. मात्र, 2013 मध्ये पहिल्यांदाच ते चार वर्षे भाजपासून दूर राहिले. दोन्ही पक्षांमध्ये अलीकडच्या काही दिवसांपासून अनेक मुद्द्यांवर वाद झाले होते. परंतु जेडीयुच्या सूत्रांनुसार, माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंग यांनी भाजपाच्या इशाऱ्यावर जेडीयूमध्ये फूट पाडण्याचा कथित प्रयत्न केल्याने दोघांमधील वाद वाढला.

- Advertisement -

राजदचे तेजस्वी यादव यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर लगेच भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नितीश कुमार यांना अनेक सवाल केले. तसेच, “जेडीयूच्या लोकांना तिकीट देण्यासाठी विद्यमान खासदारांच्या तिकीट कापले, तेव्हा भाजपा चांगली होती. मात्र आता पक्ष तोडणारी झाली आहे”, असे म्हटले.

“नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे 2019 मध्ये लोकसभा जिंकले. तसेच, 2020 मध्ये विधानसभा निवडणुकाही नरेंद्र मोदी यांच्या नावावर जिंकल्या. 1990 पासून भाजपा त्यांना वाढवण्याचे काम करत आहे. भाजपाने त्यांना केंद्रीय मंत्री केले आणि त्यांच्या पक्षात विरोध असतानाही त्यांना मुख्यमंत्री केल”, असेही त्यांनी म्हटले.

“2020 च्या विधानसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्यानंतरही भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले”, असेही माजी केंद्रीय मंत्री यांनी म्हटले.

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने बिहारमधील एकूण 40 पैकी 35 पेक्षा जास्त जागा जिंकल्याचा दावा केला आणि 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश पेक्षा जास्त बहुमत मिळाल्याचा दावा जैस्वाल यांनी केला. त्यानंतर नितीश कुमारांचे राजकारण यानंतर संपेल, असेही जैस्वाल यांनी म्हटले.


हेही वाचा – बिहारमध्ये सरकार कोसळलं, नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -