घरAssembly Battle 2022BJP SP manifesto UP election : शेतकऱ्यांना मोफत वीज, वर्षाला २ सिलेंडर...

BJP SP manifesto UP election : शेतकऱ्यांना मोफत वीज, वर्षाला २ सिलेंडर मोफत, भाजप अन् सपाकडून ९ सारखीच आश्वासनं

Subscribe

भाजप- सगळ्या प्राथमिक शाळांमध्ये टेबल, बेंच आणि फर्निचर उपलब्ध करण्यात येणार आहे. शाळांना स्मार्ट विद्यालयात रुपांतर करण्यात येईल. समाजवादी पार्टीकडून शाळांमध्ये टेबल, खुर्ची, वॉटर कूलर आणि खेळाचे साहित्य पुरवण्यात येणार आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १० फेब्रुवारी होत आहे. निवडणुकीच्या दोन दिवसांआधीच भाजप आणि समाजवादी पक्षाने आपले घोषणा पत्र जारी केले आहे. भाजपने आपल्या घोषणा पत्राला संकल्प पत्र तर सपाने वचन पत्र नाव दिले आहे. भाजपकडून यामध्ये १३० आश्वासनं केली आहेत. सपाकडून मात्र २२ संकल्प केले आहेत. यामध्ये शेतकरी, महिला आणि तरुणांसंबंधित मुद्द्यांवर दोन्ही पक्षांच्या घोषणापत्रामध्ये सारख्याच घोषणा आहेत.

शेतकऱ्यांच्या मुदद्यावरुन भाजप-सपाच्या घोषणा

एमएसपीचे आश्वासन

- Advertisement -

भाजप : आलू, टोमॅटो आणि कांद्यासारख्या सगळ्या उत्पादनावर हमीभाव देणार असल्याचे आश्वासन भाजपकडून दिले आहे. तर यासाठी १ हजार करोडचा निधी खर्चून भाव स्थिर करण्यात येणार आहे. तसेच ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना १४ दिवसांमध्ये परतावा देणार असल्याचे आश्वासन दिलं आहे.

समाजवादी पक्षाकडून सगळ्या पिकांना आधारभूत किंमत देणार असल्याचे आश्वासन दिलं आहे. तसेच समाजवादीकडूनही १५ दिवसांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना परतावा देण्याचे आश्वासन दिलं आहे.

- Advertisement -

वीज सिंचनाचे आश्वासन

शेतकऱ्यांना येत्या ५ वर्षात सिंचनासाठी मोफत वीज देण्याचे भाजपकडून सांगितले आहे. तसेच ५ हजार कोटी खर्चाची मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना सुरु करण्यात येईल. यामधून शेतकऱ्यांना कूपनलिका आणि बोअरवेल बांधण्यास मदत करण्यात येणार आहे. भाजपने ४ हजार नवीन शेतकरी सहकार गट म्हणजे एफपीओ स्थापन करण्यास सांगितले आहे.

समाजवादी पक्षाकडूनही शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सपाने प्रत्येक जिल्ह्यात २० म्हणजेच संपूर्ण राज्यात सुमारे १,५०० एफपीओ बनवण्याबाबत बोलले आहे.

महिलांसाठी आश्वासनं

भाजप आणि सपाच्या घोषणापत्रात महिलांच्या मुद्द्यावरही भर देण्यात आला आहे. ३ नवीन महिला बटालियन नेटवर्कचा विस्तार करण्यात येणार आहे. तसेच ३ हजार पिंक पोलीस नियुक्त करण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

समाजवादी पक्षाकडून पोलीस सेवेत महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी स्वतंत्र वूमन पोलीस युनिट स्थापन करण्या येणार आहे.

मोफत गॅस सिलेंडर

पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांना वर्षाला दोनवेळा मोफत सिलेंडर देण्यात येणार तर समाजवादी पार्टीकडून दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबीयांना प्रत्येक वर्षाला २ सिलेंडर मोफत देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

रोजगाराचे आश्वासन

भाजपकडून लोकसेवा आयोगासह सर्व सरकारी क्षेत्रात महिलांची संख्या दुप्पट करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाकडून महिलांसाठी शासकीय नोकरीत ३३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. पोलीस सेवेतही हे लागू होणार आहे.

आरोग्य क्षेत्रात आश्वासन

भाजपने महिलांच्या पेंशनमध्येही वाढ केली आहे. विधवा महिलांची पेंशन १५०० रुपये महिना करण्यात आली आहे. तर सपाकडून पौढ महिला आणि कौटुंबिक महिलांना प्रत्येक वर्षाला १८,००० रुपये पेंशन देण्यात येणार आहे. अत्याधुनिक रुग्णवाहिकांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. सपाकडूनही रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. ६ हजार डॉक्टरांची भर्ती करणार असून १० हजार पॅरा मेडिकल स्टाफची भर्ती करणार असल्याची भाजपने तर पॅरा मेडिकल आमि नर्सिंग स्टाफची संख्या दुप्पट करणार असल्याची घोषणा केली आहे.

विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

स्वामी विवेकानंद युवा शक्तिकरण योजनेंतर्गत २ करोड टॅब वाटण्यात येतील असे भाजपने स्पष्ट केलं आहे. तर १२ वीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप करण्यात येईल असे समाजवादी पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

पाण्याची सुविधा

भाजपकडून जल जीवन योजनेंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरी नळाने पाणी पोहोचवण्यात येणार आहे. १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात २४ तास पाण्याची सुविधा देणार असल्याचे सपाने आश्वासन दिलं आहे.

मजुरांना विम्याचे आश्वासन

विकासकामात कार्यरत असलेल्या सर्व मजुरांना मोफत जीवन विमा देण्यात येणार असल्याचे भाजकडून आश्वासन देण्यात आले आहे. तर मजुरांना आणि कामगारांना १० लाखपर्यंत विमा देण्यात येणार असल्याचे सपाकडून आश्वासन दिलं आहे. वरिष्ठ नागरिकांना आणि अपंग व्यक्तिंच्या पेंशनमध्ये वाढ करुन १५०० रुपये करण्यात येणार आहे. तर ६० वर्षांपेक्षा अधिक असलेल्या महिलांना मोफत बस सेवा पुरवण्याबाबतची घोषणा भाजपने केली आहे. समाजवादी पार्टीकडून वरिष्ठ आणि दिव्यांगांना १८ हजार रुपये म्हणजेच प्रतिमहिना १५०० रुपयांची घोषणा केली आहे. सगळ्या प्रौढ व्यक्तिंना मोफत बससेवा देण्यात येणार आहे.

शिक्षणात मोठ्या घोषणा

भाजप- सगळ्या प्राथमिक शाळांमध्ये टेबल, बेंच आणि फर्निचर उपलब्ध करण्यात येणार आहे. शाळांना स्मार्ट विद्यालयात रुपांतर करण्यात येईल. समाजवादी पार्टीकडून शाळांमध्ये टेबल, खुर्ची, वॉटर कूलर आणि खेळाचे साहित्य पुरवण्यात येणार आहेत.


हेही वाचा : ISRO ‘व्हॅलेंटाईन डे’ला लाँच करणार ‘सर्व्हेलान्स सॅटेलाइट’ EOS-4; हे मिशन महत्त्वाचे का?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -