घरदेश-विदेश'५ वर्षांत संपत्ती एवढी कशी वाढली? राहुल गांधी खुलासा करा'

‘५ वर्षांत संपत्ती एवढी कशी वाढली? राहुल गांधी खुलासा करा’

Subscribe

राहुल गांधींचं उत्पन्न गेल्या ५ वर्षांत ५५ लाखांवरून ९ कोटी कसं झालं? असा सवाल करत भाजपचे प्रवक्ते माधव भांडारपी यांनी त्याबद्दल खुलासा मागितला आहे.

‘राहुल गांधी यांचे उत्पन्न पाच वर्षांत ५५ लाखांवरून ९ कोटी कसे झाले? याचा खुलासा राहूल गांधी किंवा काँग्रेस पक्षाने करावा’, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी सोमवारी मुंबईत केली. भाजपा प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजप प्रवक्ते आणि माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये, प्रवक्ते अतुल शाह आणि कांताताई नलावडे उपस्थित होते.

उत्पन्न वाढीचा हिशोब काय?

माधव भांडारी म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणून संबोधणाऱ्या राहुल गांधी यांनीच आता त्यांच्या बेनामी संपत्तीचा हिशोब देण्याची वेळ आली आहे. राहुल गांधी यांचा खासदारकी सोडून इतर कोणताही उत्पन्नाचा स्त्रोत नसताना त्यांचे उत्पन्न ५५ लाखांवरून ९ कोटींवर कसे गेले? याचा त्यांनी खुलासा करावा. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील युनिटेक लिमिटेड कंपनीच्या गुडगाव इथल्या दोन मालमत्ता राहुल गांधी यांनी विकत घेतल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावर कॅगने दिलेल्या अहवालावर यूपीए सरकारला भाष्य करायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले त्याच्या एक दिवस आधीच राहुल गांधींनी ही मालमत्ता खरेदी केली. राहुल गांधींनी याचे स्पष्टीकरण द्यायला हवे’.

- Advertisement -

हेही वाचा – मोदींवर विरोधात FIR दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे – राहुल गांधी

दिल्लीतलं फार्महाऊस नक्की कुणाचं?

दरम्यान, दिल्लीतील फार्महाऊसवरूनही भांडारींनी टीका केली. ‘दिल्लीतले इंदिरा गांधींच्या नावाने असलेले त्यांचे फार्म हाऊस ही वडिलोपार्जित संपत्ती असल्याचा खुलासा काँग्रेसने केला आहे. मात्र राहुल गांधी यांनी या फार्म हाऊसच्या खरेदीचा व्यवहार केल्याची कागदपत्रे ही आहेत. मग ही संपत्ती वडिलोपार्जित कशी? लंडनमधली बॅकॉप्स कंपनी त्या देशात बरखास्त करून सुद्धा या कंपनीची शाखा भारतामध्ये मात्र २०१० पर्यंत सुरू होती. विशेष म्हणजे २००९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याच्या आदल्या दिवशी या कंपनीचे संचालकपद प्रियंका गांधी यांना देण्यात आले. यात काय गौडबंगाल आहे, हेही काँग्रेसने स्पष्ट करावे’ असे ते म्हणाले.

‘गरिबी हटण्याऐवजी वाढलीच!’

एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, ‘राहुल गांधी यांनी सोमवारी गरीबांसाठी किमान वेतनाची घोषणा केली. त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी गरीबी हटावच्या घोषणेवर १९७१ ची लोकसभा निवडणूक जिंकली. पण त्यानंतर गरीबी हटण्याऐवजी वाढलीच. त्यामुळे जनता राहुल गांधी यांच्या घोषणेतील फोलपणा ओळखून आहे. असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -