घरताज्या घडामोडीभारत जोडो यात्रेत भाजपासमर्थक तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

भारत जोडो यात्रेत भाजपासमर्थक तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Subscribe

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात काढण्यात येणारी भारत जोडो यात्रा सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकताना पाहायला मिळत आहे. सध्या भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये सुरू आहे. राजस्थानमधल्या कोटामध्ये या यात्रेचा आजचा चौथा दिवस असून, यामध्ये एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात काढण्यात येणारी भारत जोडो यात्रा सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकताना पाहायला मिळत आहे. सध्या भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये सुरू आहे. राजस्थानमधल्या कोटामध्ये या यात्रेचा आजचा चौथा दिवस असून, यामध्ये एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांच्या प्रसंगावधानामुळे या तरुणाचा जीव वाचला आहे. विशेष म्हणजे हा तरुण भाजपा समर्थक असल्याचे बोलले जात आहे. (BJP Supporter Man Tried To Suicide In Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Congress Rajasthan Kota)

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थाच्या कोटामध्ये यात्रेत आज एका भाजपसमर्थक तरुणाने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसाने आपली वर्दी उतरवून त्याची आग विझवली. नागरिकांनी त्याचा जीव वाचवला. युवक काँग्रेसच्या धोरणाबद्दल या तरुणाच्या मनामध्ये नाराजी होती. म्हणून त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे समजते.

- Advertisement -

दरम्यान, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा गेल्या काही दिवसांपासून वादाचा भोवऱ्यात अडकली आहे. कारण महाराष्ट्रात ही यात्रा सुरू असताना खासदार राहुल गांधी यांनी एका सभेत जनतेला संबोधित करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या सत्ताधारी भाजपाने हल्लाबोल केला होता. त्याशिवाय, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवावी, अशी तक्रार शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. दरम्यान, राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभरात आंदोलन करण्यात आले होते.

भारत जोडो यात्रेत आज जेवणाचा ब्रेक नव्हता. ही यात्रा सकाळी 11.30 वाजता संपली. कोटा जिल्ह्यातल्या प्रवासाच्या वेळापत्रकात बदल करून यात्रेचा आजचा कालावधी कमी करण्यात आला. ही यात्रा आज सलग 24 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. भदाणा हा आजच्या यात्रेचा शेवटचा मुक्काम आहे. बुंदी जिल्ह्यातल्या केशोराईपाटन इथे राहुल गांधींच्या यात्रेसाठी कॅम्प लावण्यात आला असून, तिथे पुढील दोन दिवस रात्रीचा मुक्काम असणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, कोटामधील यात्रेचे वेळापत्रक बदलल्याने राजकारण तापले आहे. याआधी बुधवारी सचिन पायलट यांची पोस्टर्स-बॅनर्स हटवण्यावरून राजकीय तणावाचे वातावरण पाहायला मिळाले होते. मात्र जयराम रमेश यांनी कार्यक्रमात असे बदल होणे सर्वसाधारण असल्याचे म्हटले आहे.


हेही वाचा – शिंदे गटातील ‘त्या’ मंत्र्याच्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांना धमकीचे २ फोन?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -