वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपची नुपूर शर्मांवर कारवाई, पक्षातून केलं निलंबित

भाजप नेते नविन जिंदाल यांनासुद्धा निलंबित करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणात निलंबितही करण्यात आले होते.

BJP suspends Nupur Sharma Naveen Kumar Jindal over inflammatory remarks against minorities
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपची नुपूर शर्मांवर कारवाई, पक्षातून केलं निलंबित

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुरु असलेल्या टीकेच्या झोडनंतर भाजपने आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. नुपूर शर्मा आणि नविन जिंदल यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजप दिल्लीचे प्रदेश मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनासुद्धा निलंबित करण्यात आले असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. त्यांनी सोशल मीडियावर सांप्रदायिक धार्मिक मुद्द्यावर वादग्रस्त पोस्ट केली आहे. तसेच हे भाजपच्या मूळ विचारांच्याविरोधात आहे. नुपूर शर्मांबाबत जारी केलेल्या पत्रात त्यांनी पार्टीच्या विचारांच्याविरुद्ध विचार व्यक्त केल्यामुळे कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेले वक्तव्य पार्टीच्या संविाधानातील नियम 10 (a)च्या विरुद्ध आहे. पूर्ण प्रकरणाचा तपास होत नाही तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह म्हणाले की, भाजप कोणत्याही धर्माच्या व्यक्तींचा अपमान झाल्यास स्वीकार करत नाही. तसेच भाजपल कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या भावना दुखावणारी कोणतीही कल्पना मान्य नाही.

भाजप मुख्यालयाकडून जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्म हा बहरला आणि फूलला आहे. भाजप सर्वच धर्मांचा सन्मान करते. तसेच कोणत्याही धर्माच्या कोणत्याही व्यक्तीचा अपमानाबाबत तीव्र शब्दात निषेध करते. पार्टी अशा विचारांच्या विरोधात आहे. जे धर्माचे आणि समाजाचे अपमान करतात. अशा कोणत्याच विचारधारेचा प्रचार भाजप करत नाही.

नविन जिंदाल निलंबित

भाजप नेते नविन जिंदाल यांनासुद्धा निलंबित करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणात निलंबितही करण्यात आले होते. भाजपने जारी केलेल्या पत्रात असे म्हटलं आहे की, “आपण सोशल मीडियावर जातीय सलोखा भडकावणारी मते व्यक्त केली आहेत. हे भारतीय जनता पक्षाच्या मूळ कल्पनेच्या विरोधात आहे.” आपण पक्षाच्या विचार आणि धोरणांच्या विरोधात काम केल्याचे पत्रात पुढे लिहिले आहे. त्यामुळे तुमचे भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व तात्काळ संपुष्टात येत असून तुमची पक्षातून निलंबित करण्यात आले असल्याचे पक्षाने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.


हेही वाचा :  भाजपला सर्वधर्मांचा आदर, प्रवक्ता नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्यावर पार्टीची स्पष्टोक्ती