नेपाळच्या क्लबमध्ये राहुल गांधींची पार्टी, भाजपने व्हिडीओ शेअर करत साधला निशाणा

BJP targeted by sharing video Rahul Gandhi party in a Nepali club
नेपाळच्या क्लबमध्ये राहुल गांधींची पार्टी, भाजपने व्हिडीओ शेअर करत साधला निशाणा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी नेपाळच्या प्रसिद्ध क्लबमध्ये पार्टी करत असतानाचा एक व्हिडीओ भाजपकडून शेअर करण्यात आला आहे. राहुल गांधील क्लबमध्ये पार्टी करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. राहुल गांधींचा व्हिडीओ व्हायरल करत भाजपने जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. भारतातील समस्यांवर लक्ष देण्याचे सोडून राहुल गांधी नेपाळच्या क्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत. असे भाजप प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी नेपाळच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेपाळच्या Lord of The Drinks, Nepal या नाईटक्लबमध्ये दिसत आहेत. भाजप प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. राहुल गांधी काय करत आहेत? हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे. परंतु राजस्थानच्या जोधपुरमध्ये हिंसा होत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकार आहे. राजस्थान जळत आहे. यावर चिंता व्यक्त करण्याचे सोडून राहुल गांधी नेपाळमधील नाइटक्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत. त्यांना भारतातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत.

दरम्यान काँग्रेसवर निशाणा साधत पूनावाला यांनी पुढे म्हटलं आहे की, काँग्रेस पक्ष संपला आहे. परंतु राहुल गांधींची पार्टी अशीच चालणार आहे. ते राजकारणात गंभीर नाहीत. त्यांच्या पक्षाला आणि देशातील लोकांना त्यांची गरज असताना ते नेपाळमध्ये पार्टी करत आहेत.

पार्टी हॉलिडे देशासाठी नवीन नाही – किरेन रिजिजू

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीसुद्धा राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर करत रिजिजू यांनी निशाणा साधला आहे. पार्टी, सुट्ट्या, प्लेजर ट्रिप, खाजगी परदेशी दौरा या गोष्टी देशासाठी नवीन नाहीत. असे केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंच्या भाषणाबाबत आजच कारवाई, राज्यात ३० हजार पोलीस तैनात, पोलीस महासंचालकांची प्रतिक्रिया