घरदेश-विदेशBJP Vs Congress : खर्गे पुत्राच्या वक्तव्याचे पडसाद, शुक्रवारी भाजपा करणार राज्यव्यापी...

BJP Vs Congress : खर्गे पुत्राच्या वक्तव्याचे पडसाद, शुक्रवारी भाजपा करणार राज्यव्यापी आंदोलन

Subscribe

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पुत्राने वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. महाराष्ट्र भाजपा या वादग्रस्त वक्तव्याविरोधात रस्त्यावर उतरणार असून उद्या, शुक्रवारी राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा – Nawab Malik controversy : अजित पवारांबाबतचे पत्र कोणाला लिहिणार? सुषमा अंधारेंचा फडणवीसांना प्रश्न

- Advertisement -

कर्नाटकचे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रियांक खर्गे यांनी वीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. आपण विधानसभेचे अध्यक्ष असतो तर बेळगाव येथील सुवर्णसौध या विधानसभेतून वीर सावरकर यांचा फोटो काढून टाकला असता, असे सांगून, सावरकर यांचे योगदान काय? सावरकर यांना वीर ही पदवी कशी मिळाली हे भाजपाने सांगावे? असे आवाहन त्यांनी दिले. ज्यांची विचारधारा द्वेष आणि फूट पाडत असेल तर त्यांचा फोटो नको. म्हणून सावरकर यांचे चित्र विधानसभेत नसावे, असे माझे मत आहे. आता हे पक्षाचे मत आहे की नाही, ते मला माहीत नाही, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

महाराष्ट्रात आंदोलनाचा पवित्रा

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांच्याविरोधात महाराष्ट्र भाजपाच्या वतीने उद्या, शुक्रवारी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. भाजपाचे सर्व कार्यकर्ते राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा – Fadnavis Letter Bomb : नवाब मलिक यांना महायुतीत घेऊ नका…..देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवार यांना पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -