Homeदेश-विदेशBJP Vs Congress : डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरून राजकारण, भाजपाचा काँग्रेसवर...

BJP Vs Congress : डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरून राजकारण, भाजपाचा काँग्रेसवर पलटवार

Subscribe

डॉ. मनमोहन सिंग हे नेहरू आणि गांधी घराण्याबाहेरचे देशाचे पहिले पंतप्रधान होते, ज्यांनी 10 वर्षे पंतप्रधानपद भूषवले, याचे मी स्मरण करून देतो. काँग्रेस पक्षाने डॉ. मनमोहन सिंग यांचा आयुष्यात कधीही आदर केला नाही. आज त्यांच्या निधनानंतरही ते राजकारण करताना दिसत आहे.

(BJP Vs Congress) नवी दिल्ली : ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरून काँग्रेस आणि भाजपावरून वार-पलटवार सुरू झाले आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि स्मारकासाठी सरकारला जागा मिळू शकली नाही, हा त्यांचा अपमान आहे, असा आरोप काँग्रेसने केला. तर काँग्रेसवर याबाबत राजकारण करत असल्याचा पलटवार भाजपाने केला आहे.

देशाच्या आर्थिक विकासाचा पाया रचणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांचा योग्य तो सन्मान करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. म्हणूनच, मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस पक्षाला देखील याची माहिती देण्यात आली असल्याचे भाजपाचे खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Dr Manmohan Singh : जुमलेबाजी न करताही देशाचे नेतृत्व करता येते…, ठाकरे गटाचा मोदींवर निशाणा

सरकारने मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला असून भूसंपादन, ट्रस्टची निर्मिती तसेच जमीन हस्तांतरण यासारख्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जो वेळ त्यात शक्य तितक्या लवकर हे काम केले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगितले असल्याची माहितीही डॉ. त्रिवेदी यांनी दिली.

- Advertisement -

वास्तविक, डॉ. मनमोहन सिंग हे नेहरू आणि गांधी घराण्याबाहेरचे देशाचे पहिले पंतप्रधान होते, ज्यांनी 10 वर्षे पंतप्रधानपद भूषवले, याचे मी स्मरण करून देतो. काँग्रेस पक्षाने डॉ. मनमोहन सिंग यांचा आयुष्यात कधीही आदर केला नाही. आज त्यांच्या निधनानंतरही ते राजकारण करताना दिसत आहे. निदान आजच्या या दु:खाच्या काळात तरी राजकारण टाळायला हवे. जोपर्यंत आमच्या सरकारचा प्रश्न आहे, पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने पक्षीय भावनांच्या पलीकडे जाऊन सर्व नेत्यांचा आदर केला आहे, असशी पुस्तीही त्यांनी जोडली.

काँग्रेसने केली होती टीका

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना फोन करून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधण्याची मागणी केली होती. खर्गे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरकारने जागा देण्याबाबत विचार करण्यासाठी दोन-चार दिवसांचा अवधी मागितला. यावरून राजकारण तापले आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कार आणि स्मारकासाठी जागा शोधण्यात सरकारला आलेले अपयश म्हणजे, भारताच्या पहिल्या शीख पंतप्रधानांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – Dr Manmohan Singh : काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर प्रणव मुखर्जींची कन्या संतापली, म्हणाली…


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -