घरदेश-विदेशBJP vs Thackeray group : भाजपा हा भ्रष्टाचाऱ्यांचा कुंटणखाना, ठाकरे गटाचा हल्लाबोल

BJP vs Thackeray group : भाजपा हा भ्रष्टाचाऱ्यांचा कुंटणखाना, ठाकरे गटाचा हल्लाबोल

Subscribe

मुंबई : भाजपा हा भ्रष्टाचाऱ्यांचा कुंटणखाना बनला आहे आणि तेथे नीतिमत्ता, चारित्र्य अशा शब्दांना मोल उरले नाही. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेने भाजपाची विकृतीच उघड झाली. जेथे आपली राज्ये नाहीत ती दहशतीच्या बळावर उलथवून टाकायची. ही कोणत्या पद्धतीची लोकशाही? हा कोणता कायदा? हे कसले स्वातंत्र्य? अजित पवार, एकनाथ मिंध्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. ते मोदी यांना प्रिय झाले; पण सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्यांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरले, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : “रेल्वे भारताची संपत्ती, कोणाच्या…”, भाजपाच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

- Advertisement -

सध्याच्या राजकीय वातावरणात सगळेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मुख्यमंत्री एकनाथ ‘मिंधे’ नसतात. काही झारखंडचे स्वाभिमानी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेनसुद्धा असतात. याची प्रचीती एव्हाना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आली असेल, असे सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे.

हेमंत सोरेन हे जात्यात आहेत तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तूर्त सुपात असले तरी त्यांच्या अटकेची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा करत आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार त्यांनी ‘ईडी’च्या धाकाने आधीच पाडले. तर बिहारच्या नितीश कुमार यांना त्यांच्या मानसिक विकलांगतेचा गैरफायदा घेऊन ‘पलटी’ मारायला भाग पाडले. नितीश कुमारांच्या निकटवर्तीयांवरही ‘ईडी’चे छापे पडले. बिहारात नितीश कुमार झुकले, पण लालू यादव आणि त्यांचे कुटुंब मोदी-शहांसमोर झुकायला तयार नाही, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Jharkhand : मिंध्या आमदारांनी ‘त्यांच्या’ पायांचे तीर्थ प्राशन केले पाहिजे, ठाकरे गटाचा टोला

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी तर स्फोटच केला. ‘भाजपात प्रवेश करण्यासाठी आपल्यावर दबाव आहे.’ केजरीवाल यांनी जाहीर केले आहे की, ‘तुरुंगात जाईन. संघर्ष करीन, पण भाजपाच्या दडपशाहीसमोर झुकणार नाही.’ महाराष्ट्र हा शिवरायांचा वारसा सांगतो. तरी स्वतःस मर्द-मऱ्हाटे म्हणवून घेणाऱ्यांनी दिल्लीच्या पायाशी लोळण घेतली आणि महाराष्ट्राचे नाक कापले. पण झारखंड आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी लढाईसाठी तलवार उपसली, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut On CM Shinde : मुख्यमंत्री शिंदेंसोबत गुंड निलेश घायवळ: संजय राऊतांकडून फोटो ट्वीट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -