कंगनाला मिळणार मंडी मतदारसंघांची उमेदवारी; भाजपमध्ये जोरदार चर्चा

Kangana Ranaut sessions court rejected request to transfer other hearing in javed Akhtar defamation case
Kangana Ranaut: कंगना राणौतला सत्र न्यायालयातही दिलासा नाही, जावेद अख्तर प्रकरणी स्थानांतरित अर्ज फेटाळला

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिमाचल प्रदेशच्या मंडी सीटवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवार राहू शकते, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. या सीटचे भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचे या वर्षी मार्चमध्ये निधन झाले. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. मंडी लोकसभा जागेबरोबरच तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूकही ३० ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश पोटनिवडणुकीसाठी धर्मशाळेत भाजपच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे. भाजपला मंडी सीटवरून कंगना राणावतला तिकीट द्यायचे आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही या उमेदवारांबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप कंगनाने निवडणूक लढवण्याची इच्छा उघडपणे व्यक्त केलेली नाही.

कंगना राणावत ही मंडी जिल्ह्यातील भांबला गावातील आहे आणि तिने आपले नवीन घर मनालीमध्ये बांधले आहे, जे मंडी लोकसभा मतदारसंघात येते. मंडीबरोबरच हिमाचलमधील फतेहपूर, जुबल कोथकाई आणि आर्की विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. या वर्षी माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर आर्की जागा रिक्त झाली आहे. येथे जिंकलेल्या उमेदवारांच्या मृत्यूनंतर उर्वरित दोन जागाही रिक्त झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगानं ३ लोकसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. त्यामध्ये मध्य प्रदेशातील खांडवा मतदारसंघ, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि दादरा नगर हवेली मतदारसंघांची पोटनिवडणूक येत्या ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. आसाममधल्या ५, पश्चिम बंगाल मधल्या ४, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी ३, राजस्थान, बिहार आणि कर्नाटकातील प्रत्येकी २ मतदारसंघांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मिझोरम, नागालँड आणि तेलंगणातील प्रत्येकी एका मतदारसंघातही याच दिवशी निवडणूका होत आहेत. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली असून ८ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.


अभिनेता मनोज बाजपेयीच्या वडिलांचे ८३ व्या वर्षी निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास