नरेंद्र मोदींविरोधात बोलणाऱ्यांना भाजपाचा इशारा, विरोधकांवर ‘सुदर्शन चक्र’ फिरवणार

मोदींसाठी अपशब्द वापरणे ही काँग्रेससाठी सामान्य बाब आहे, असंही ते म्हणाले. मोदींविरोधात बोलणाऱ्यांविरोधात लोक सुदर्शन चक्र फिरवतील, असं संबित पात्रा म्हणाले.

नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Congress President Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा उल्लेख रावण असा केला होता. तर, काँग्रेसचे कर्नाटकमधील नेते व्ही.एस उग्रप्पा यांनी त्यांचा उल्लेख भस्मासूर असा केला आहे. यावरून भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा (BJP Spokeperson Sambit Patra) यांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच, मोदींसाठी अपशब्द वापरणे ही काँग्रेससाठी सामान्य बाब आहे, असंही ते म्हणाले. मोदींविरोधात बोलणाऱ्यांविरोधात लोक सुदर्शन चक्र फिरवतील, असं संबित पात्रा म्हणाले.

हेही वाचा – काश्मीरमध्ये कुरिअरने होतेय दहशतवाद्यांना फंडिंग; पाकिस्तानी संघटनेचा डाव, एसआयएकडून पर्दाफाश

संबित पात्रा पत्रकार परिषदेत म्हणाले की, काँग्रेसने मोदींना 100 शिव्या दिल्या आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत लोकशाही पद्धतीने विरोधी पक्षाचा नायनाट करण्यासाठी लोक भगवान कृष्णासारखे ‘सुदर्शन चक्र’ फिरवतील. मोदी सरकारने अनेक विकासात्मक आणि कल्याणकारी योजना सुरू केल्या असून हे करणारा नेता कधीही ‘भस्मासूर’ होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. एकीकडे जग मोदींच्या पाठीशी उभे आहे आणि दुसरीकडे काँग्रेस त्यांच्यासाठी अशी भाषा करत आहे. हे अत्यंत दुःखद आणि चिंताजनक आहे, असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा – देशभरातील 340 महिला अग्निवीरांचा पुढच्या वर्षी होणार नौदलात समावेश

उद्यापासून दोन दिवसीय बैठक, नड्डा अध्यक्षस्थानी

भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ५ आणि ६ डिसेंबरला दिल्लीत राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यांनी शनिवारी ही घोषणा केली. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी समारोपाच्या सत्राला संबोधित करण्याची शक्यता आहे. गुजरात आणि दिल्लीत आज मतदान होत आहे. त्यामुळे, अशा स्थितीत पक्ष आता भविष्यातील रणनीतीवर भर देणार आहे.

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि पुढील वर्षी अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या रणनीती आणि तयारीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, सर्व राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी, सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि संघटन सरचिटणीस यांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.