घरदेश-विदेशपूर्वोत्तर राज्यांच्या विकासाचा काळ आता जवळ आला; त्रिपुरा, नागालँड विजयानंतर मोदींचे वक्तव्य  

पूर्वोत्तर राज्यांच्या विकासाचा काळ आता जवळ आला; त्रिपुरा, नागालँड विजयानंतर मोदींचे वक्तव्य  

Subscribe

आता आम्ही एका वेगळ्या मार्गावर निघालेली पूर्वोत्तर राज्ये पाहात आहोत. दिल्ली आणि पूर्वोत्तरमध्ये आता मनोमिलन होत आहे. नव्या विचारांचा हा परिणाम असल्याचं मोदी म्हणाले.

नवी दिल्ली – त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी मोबाईल फ्लॅश लाईट लावून पूर्वोत्तर राज्यातील जनतेला धन्यवाद दिले. (BJP wins in Nagaland, Tripura in North East, Modi live from Delhi)

पंतप्रधान मोदी म्हणाले, हा प्रकाश पूर्वोत्तरच्या देशभक्तीचा हा सन्मान आहे. आज त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील भाजप कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो.
मोदी म्हणाले, इतर राज्यांत काम करणे आणि पूर्वोत्तर राज्यात काम करणे यात फरक आहे. इतर राज्यांच्या तुलनेत पूर्वोत्तरमध्ये काम करणे अवघड आहे, त्यामुळे येथे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन आहे.

- Advertisement -

यापूर्वी पूर्वोत्तर राज्यातील निकालांचं दिल्लीत फार कौतुक होत नव्हतं. इथं चर्चा व्हायची ती फक्त पूर्वोत्तर राज्यातील हिंसाचाराची. त्रिपुरामध्ये तर एका पक्षाच्या झेंड्याशिवाय दुसरा कोणाचा झेंडा तिथे फडकू शकत नव्हता. एखाद्याने वेगळा प्रयत्न केला तर त्याला रक्तबंबाळ केले जात होते.
आता आम्ही एका वेगळ्या मार्गावर निघालेली पूर्वोत्तर राज्ये पाहात आहोत. दिल्ली आणि पूर्वोत्तरमध्ये आता मनोमिलन होत आहे. नव्या विचारांचा हा परिणाम असल्याचं मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, आता पूर्वोत्तर राज्यांचा विकास मला दिसत आहे. या राज्यांच्या विकासाचा काळ आता आला आहे. मी नुकताच तिथे जाऊन आलो तेव्हा, एकाने मला शुभेच्छा दिल्या की, मोदीजी तुम्हाला हाफ सेंच्युरीसाठी शुभेच्छा. मी विचारले कसली हाफ सेंच्युरी, तेव्हा त्यांनी सांगितले की पंतप्रधान झाल्यानंतर हा तुमचा पूर्वोत्तरचा ५० वा दौरा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -