दिल्लीत भाजप vs आप; भाजपने आपच्या आमदाराचे फोडले ऑफिस

भाजपा कर्यकर्त्यांनी आपचे आमदार आणि दिल्लीतील जल बोर्डाचे उपाध्यक्ष राघव चंढ्ढा यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. यासंदर्भात राघव चंद्रा यांनी व्हिडिओ पोस्ट करुन माहिती दिली आहे.

bjp workers break aap mlas office delhi raghav chadha
दिल्लीत भाजप vs आप; भाजपने आपच्या आमदाराचे फोडले ऑफिस

दिल्लीतील भाजपा आणि आम आदमी पार्टी आमने सामने आली असून हा संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. आज भाजपा कर्यकर्त्यांनी आपचे आमदार आणि दिल्लीतील जल बोर्डाचे उपाध्यक्ष राघव चंढ्ढा यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. यासंदर्भात राघव चंद्रा यांनी व्हिडिओ पोस्ट करुन माहिती दिली आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, ‘माझ्या अनेक सहकाऱ्यांना मरहाण केली आहे. त्यामुळे अनेक सहकारी घाबरले आहेत’, असे ट्विट चंद्रा यांनी केले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मात्र, भाजप समर्थकांना पोलिसांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कार्यालयात प्रवेश केला.

शेतकऱ्यांची बाजू घेणे बंद करा

भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपचे आमदार चंढ्ढा यांच्या कार्यालयावर धडक देत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. तसेच ‘मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटोही भिंतीवरुन खाली काढून फाडण्यात आला. या घटनेमुळे कार्यालयातील सर्वच सहकारी घाबरुन गेले. तसेच माझ्या नावाचा उल्लेख करत, राघव चढ्ढा तुमचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समजावून सांगा, शेतकऱ्यांचे लई हित बघतोय का? शेतकऱ्यांची बाजू घ्यायची बंद करा. अन्यथा एकएक करत आम आदमी पक्षाच्या सर्वच उमेदवारांना आम्ही असाच धडा शिकवू’, असे तोडफोड केलेल्या भाजपा समर्थकांनी म्हटल्याचे आमदार चढ्ढा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

भ्याड हल्ल्यांना आम्ही घाबरत नाही

दरम्यान, या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट करत भाजपाला आव्हान दिले आहे. मी आणि माझं सरकार शेवट्च्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठीच लढत राहिल. यांसारख्या भ्याड हल्ल्यांना आम्ही घाबरत नाही. सर्वच कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की, भाजपाच्या अशा हल्ल्यांनी गोंधळून न जाता संयम ठेवा, आपण शेतकऱ्यांच्या बाजूने उभे रहा, असे केजरीवला यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.


हेही वाचा – इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला संशयित रूग्ण आढळला नागपूरात!