घरदेश-विदेशPM Modi 71st Birthday: मोदींच्या वाढदिवसानिमित्त कापला कोरोना लसीचा ७१ फूटी लांबलचक...

PM Modi 71st Birthday: मोदींच्या वाढदिवसानिमित्त कापला कोरोना लसीचा ७१ फूटी लांबलचक केक!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आणि पक्षाने २० दिवसांच्या देशव्यापी मोहिमेची योजना देखील आखली आहे, ज्याला सेवा आणि समर्पण अभियान असे नाव देण्यात आले आहे. देश आणि जगातील सर्व नेते पंतप्रधान मोदींना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त मागवलेला अनोखा केक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. मध्य प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी भोपाळमधील लालघाटी चौकात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ७१ फूट लांबलचक केक कापला. लसीच्या आकारात बनवलेला हा केक बऱ्यापैकी आकर्षक होता. तर उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये गुरुवारी भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी ७१ दिवे लावले आणि ७१ किलो लाडूही अर्पण केलेत.

- Advertisement -

मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप शुक्रवारपासून २० दिवसांची जनसंपर्क मोहीम सुरू करणार आहे. ही मोहीम ७ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. आपल्या सेवा आणि समर्पण मोहिमेचा भाग म्हणून पक्षाने देशभरातील आपल्या कार्यकर्त्यांना मोदींच्या जन्म तारखेला कोरोना लसीकरणाचा प्रचार करण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही भाजप कार्यकर्त्यांना शुक्रवारी लसीकरण मोहिमेला गती देण्याची विनंती केली. गुरूवारी, त्यांनी ट्विट केले, “उद्या आपल्या प्रिय पंतप्रधानांचा वाढदिवस आहे. या दिवशी ज्यांनी लसीकरण केले नाही, त्यांना त्यांच्या व्यक्ती आणि कुटुंबातील सदस्यांसह समाजातील सर्व घटकांकडून लसीकरण करून घ्या. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यापासून भाजप त्यांचा जन्म दिवस सेवा दिवस म्हणून साजरा करत आहे.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप आज दिल्ली मुख्यालयात ‘सेवा आणि समर्पण अभियान’ कार्यक्रम सुरू करणार आहे. हा कार्यक्रम ७ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार असून ७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रवासाला २० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच, भाजप युवा संघटना या दिवशी रक्तदान शिबीर आयोजित करणार आहेत. या मोहिमेत भाजप कार्यकर्ते घरोघरी, विविध कार्यक्रमांद्वारे जनतेशी संपर्क साधतील आणि संवाद साधतील, सेवाकार्य करणार असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपने २० दिवसांच्या देशव्यापी मोहिमेची योजना आखली आहे जी आजपासून सुरू होईल आणि ७ ऑक्टोबर रोजी संपणार आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -