घरदेश-विदेशभाजप कार्यकर्त्याच्या हत्येमुळे कर्नाटकात तणावाचे वातावरण; वर्षपूर्तीचे कार्यक्रम मुख्यमंत्र्यांकडून रद्द

भाजप कार्यकर्त्याच्या हत्येमुळे कर्नाटकात तणावाचे वातावरण; वर्षपूर्तीचे कार्यक्रम मुख्यमंत्र्यांकडून रद्द

Subscribe

दक्षिण कन्नड मधील भाजपचे युवा मोर्चाचे प्रवीण नेत्तरू यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. याच हत्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोम्मई यांनी सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

बसवराज बोम्मई यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊन आज वर्षपूर्ती झाली आहे. रत्याचबरोबर त्यांच्या सरकारलाही एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि त्याच निमित्ताने कर्नाटक राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पण ते सगळेच कार्यक्रम मुख्यमंत्री बोम्मई यांनी रद्द केले. दक्षिण कन्नड मधील भाजपचे युवा मोर्चाचे प्रवीण नेत्तरू यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. याच हत्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोम्मई यांनी सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बोम्मई प्रवीण नेत्तरू यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी बेल्लारे येथे जाणार आहेत.

हे ही वाचा – मला तू ओळखतेस का? असे पंतप्रधान मोदींनी विचारताच ८ वर्षीय बालिका म्हणाली…

- Advertisement -

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत दोड्डबल्लापूर येथे ‘जनोत्सव’ ही मेगा रॅली होणार होती ती सुद्धा रद्द करण्यात आली. याच संदर्भात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. अशी माहिती दिली. त्याच बरोबर राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी कृत्य करणाऱ्या शक्तींचा नायनाट कारण्यासाठी कर्नाटक राज्यत विशेष प्रशिक्षित कमांडोची फोर्स उभी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. असंही त्यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा – पश्चिम बंगालचा होतोय महाराष्ट्र ! तृणमूलचे ३८ आमदार भाजपच्या वाटेवर ?

- Advertisement -

“प्रवीण यांच्या हत्येनंतर आमच्या मनात संताप आहे. शिवमोग्गा येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाच्या हत्येनंतर काही महिन्यांत घडलेल्या या धक्कादायक घटनेने मला दुःख झालंय. आज माझ्या सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय आणि बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आल्यानंतर भाजपाच्या सत्तेला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आम्ही जनोत्सवाची योजना आखली होती, परंतु मृत प्रवीणची आई आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना पाहून मी उद्याचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे,” असंही ते म्हणाले.

हा ही वाचा – मुख्यमंत्री आपला मुक्काम दिल्लीत हलवतील असं वाटतंय, संजय राऊतांचा खोचक टोला

नेमकी घटना काय घडली

भाजप जिल्हा युवा मोर्चा समितीचे प्रवीण नेत्तरू यांची बेल्लोरे येथील त्याच्या दुकानासमोर मंगळवारी रात्री तीन जणांनी दुचाकीवरून येत वार करून प्रवीण यांची हत्या केली. ते दक्षिण मधील बेल्लारे उठली रहिवासी होते. रात्री दुकान बंद करून ते घरी जात असताना त्याच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेनंतर दक्षिण कन्नडच्या काही भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यातच आंदोलकांनी दगडफेक केल्याने पोलिसांनाही लाठीचार्ज करावा लागला. हिंदू कार्यकर्त्यांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत नसल्याचा आरोप करत भाजपा आणि संघ परिवाराच्या समर्थकांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला होता.

हे ही वाचा –  एकनाथ शिंदेंची आणखी एक ऑडियो क्लिप व्हायरल, बुलडाण्यातील शेतकऱ्याला दिलं आश्वासन

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -