घरताज्या घडामोडीज्योतिरादित्य सिंधिया भाजपच्या प्रचारात म्हणतात 'काँग्रेसला मत द्या'!

ज्योतिरादित्य सिंधिया भाजपच्या प्रचारात म्हणतात ‘काँग्रेसला मत द्या’!

Subscribe

मध्य प्रदेशमधल्या विधानसभा पोट निवडणुका गेल्या काही दिवसांपासून भलत्याच चर्चेत आहेत. विशेषत: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार आणि राज्यातल्या मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल केलेल्या ‘आयटम’ वक्तव्यामुळे मध्य प्रदेशच्या निवडणुकांचीही चर्चा बिहार निवडणुकांइतकीच व्हायला लागली आहे. त्यात आता काँग्रेसमधून आता भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घातलेला घोळ चर्चेत आला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपच्या एका उमेदवाराच्या प्रचारात चक्क काँग्रेसला मत देण्याचं आवाहन मतदारांना करून टाकलं. यामुळे उपस्थितांसह स्टेजवरच्या उमेदवाराला देखील काय बोलावं ते कळेना. आणि या उमेदवार होत्या खुद्द इमरती देवी!

डबरामध्ये शनिवारी भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांच्या प्रचारासाठी ज्योतिरादित्य सिंधिया आले होते. स्टेजवर प्रचार करताना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी इमरती देवींच्या प्रचारासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी भाषणादरम्यान आवेषात येत मतदारांना भलतंच आवाहन करून टाकलं. ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, ‘जर इमरती देवींवर तुम्हाला विश्वास आहे, तर हात वर उचलून त्यांना विश्वास द्या. आपल्या डबराच्या शानदार आणि जानदार जनतेनं असा विश्वास द्या की ३ तारखेला इमरती देवींना जिंकवून द्याल. आपल्या मुठी वर करून सांगा की ३ तारखेला हाताचा पंजा असलेलं बटण दाबाल’!

- Advertisement -

दरम्यान, सिंधिया यांनी हे आवाहन करताच इमरती देवींना काय करावं हे सुचेना. कारण यावेळी त्यांचा हात सिंधियांनी वर उचलला होता. पण पुढच्याच क्षणी आपली चूक सिंधियांना लक्षात आली आणि त्यांनी प्रकरण सावरून घेतलं. पुढच्याच वाक्याला सिंधिया म्हणाले, ‘कमळाचं फूल असलेलं बटण दाबा. पंजाच्या बटणाचा पसारा आवरून त्यांना आपण इथून बाहेर काढू’!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -