घरताज्या घडामोडीCorona: कोरोनाचा कहर कायम; भाजप खासदाराचे कोरोनामुळे निधन

Corona: कोरोनाचा कहर कायम; भाजप खासदाराचे कोरोनामुळे निधन

Subscribe

कोरोनामुळे अजून एका राजकीय नेत्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मध्यप्रदेशमधील खंडवाचे भाजप खासदार नंद कुमार सिंह चौहान ऊर्फ नंदू भैया यांचं निधन झालं आहे. दिल्लीच्या एनसीआर येथील मेदांता रुग्णालयात नंद कुमार सिंह यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. परंतु ते कोरोनासोबतची लढाई जिंकू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला. नंद कुमार सिंह कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ११ जानेवारीला त्यांना भोपाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. परंतु त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीत आणण्यात आलं.

- Advertisement -

२०१९मध्ये सहाव्यांदा नंद कुमार सिंह मध्यप्रदेशच्या खंडवा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. नंद कुमार सिंह यांचा जन्म ८ सप्टेंबर १९५२ साली खंडवा जिल्ह्यातील शाहपूरमध्ये झाला. १९९६ सालापासून नंदर कुमार सिंह यांच्या राजकीय क्षेत्रातील करिअरला सुरुवात झाली. शाहपूर नगर परिषदच्या अध्यक्ष पदावरून त्यांनी राजकारणात एंट्री घेतली.

नंद कुमार सिंह यांच्या निधनानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. शिवराज चौहान म्हणाले की, ‘लोकप्रिय नेता नंदू भैया आम्हाला सोडून गेले. भाजपने एक आदर्श कार्यकर्ता, योग्य संघटक आणि पक्षाचा समर्पित नेता गमावला. हे त्यांच्यासाठी नुकसान आहे.’

- Advertisement -


हेही वाचा – Live Update: केंद्रीय राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी घेतली कोरोनाची लस


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -