मध्य प्रदेश : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराला सुरुवात केली आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून पक्षाच्या नेत्यांनी पक्षाची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून ते लोकांमध्ये जाऊन जनाधार वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र याच आता दरम्यान, भाजपकडून मध्य प्रदेशच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना मुद्दामहून डावलण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. खरे तर माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना जनआशीर्वाद यात्रेचे पक्षाकडून कोणतेही निमंत्रण देण्यात आलेले नाही, त्यामुळे त्यांनी याबाबत ट्वीट करून अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. (BJP’s senior leader Uma Bharti being dropped from party? tweet caught everyone’s attention)
हेही वाचा – पुरावे… पुरावे… करत आहेत, मग आधी त्यांनी त्यांच्या भ्रष्टाचारचे पुरावे…; ठाकरेंनी अजित पवारांना लगावला टोला
याबाबत बोलताना उमा भारती म्हणाल्या की, आमच्या पक्षात सध्या वापर करा आणि फेकून द्या, असे करण्यात येत आहे. परंतु मी असे होऊ देणार नाही. कारण पक्ष माझे सर्वस्व आहे. मी पक्षातील दुष्कृत्ये दूर करेन. मला पक्षाकडून करून सुरू करण्यात येणाऱ्या जनआशीर्वाद यात्रेला बोलविण्यात का आले नाही, याबाबत देखील नक्की विचारेन. भाजपने माझ्याशी राजकीय संबंध तोडले आहेत. तसेच, त्यांनी बॅनर आणि पोस्टरवर देखील माझे नाव लिहिलेले नाही. फोटोसुद्धा लावलेला नाही. हे जे काही होत आहे, ते नक्कीच चांगले नाही. मला पक्षाकडून कोणतेही आमंत्रण आलेले नाही. त्यामुळे आता यापुढे आमंत्रण आले तरी त्या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी होणार नाहीत, असेही उमा भारती यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबतचे ट्वीट करत मध्य प्रदेशच्या माजी उपमुख्यमंत्री उमा भारती म्हणाल्या की, जन आशीर्वाद यात्रेचे मला निमंत्रण मिळालेले नाही. हे सत्य आहे. परंतु आमंत्रण मिळो अथवा न मिळो याने काहीही कमी जास्त होणार नाही. हा पण जर का मला आता आमंत्रण देण्यात आले तरी जनआशीर्वाद यात्रेच्या ना सुरुवातीला जाणार, ना या कार्यक्रमाचा शेवट होईल त्या दिवशी जाणार, असे उमा भारती यांच्याकडून स्पष्ट शब्दांत ट्वीट करण्यात आले आहे.
3) मुझे जन आशीर्वाद यात्रा के प्रारंभ में निमंत्रण नहीं मिला यह सच्चाई है कि ऐसा मैंने कहा है लेकिन निमंत्रण मिलने या ना मिलने से मैं कम ज्यादा नहीं हो जाती । हाँ अब यदि मुझे निमंत्रण दिया गया तो मैं कही नहीं जाऊँगी । ना प्रारंभ में ना 25 सितंबर के समापन समारोह में । @BJP4MP
— Uma Bharti (@umasribharti) September 4, 2023
हे ट्वीट करण्याआधी उमा भारती यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, भाजपची जनआशीर्वाद यात्रा निघणार आहे. पण मला या यात्रेसाठी कुठेही बोलविण्यात आलेले नाही. याने मला काहीही फरक पडत नाही. पण हा यामुळे एक प्रश्न नक्कीच निर्माण होत आहे की, जर का ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एक सरकार बनवले. तर मी देखील एक सरकार माझ्या नेतृत्वात तयार केले होते. तसेच, मला या यात्रेमध्ये सहभागी व्हायचे नाही. भाजपच्या लोकांना भीती वाटते की मी तिथे पोहोचले तर लोकांचे सर्व लक्ष माझ्याकडे जाईल. मला जायचे नव्हते, पण त्यांनी कमीत कमी आमंत्रण देण्याची औपचारिकता तरी पूर्ण करायला हवी होती, अशी खंत उमा भारती यांनी व्यक्त केली आहे.