Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश मध्यप्रदेश - छत्तीसगड निवडणुकांसाठी भाजपने कसली कंबर; उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मध्यप्रदेश – छत्तीसगड निवडणुकांसाठी भाजपने कसली कंबर; उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Subscribe

केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक एक दिवस आधी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी दिल्लीत झाली होती.

नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय स्तरावरील नेत्यांनी आज मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेशासाठी 39 तर छत्तीसगडमधील 21 उमेदवारांचा समावेश आहे. नेहमी निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर उमेदवारांची यादी जाहीर करणाऱ्या भाजपने यावेळी मात्र ही परंपरा खंडीत केली आहे.(BJPs waist for Madhya Pradesh-Chhattisgarh elections First list of candidates announced)

भाजपने गुरुवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत दोन्ही राज्यांतून शिवराजसिंह चौहान, नरोत्तम मिश्रा आणि रमण सिंह या नेत्यांची आणि मंत्र्यांची नावे गायब आहेत. पक्षाने 90 सदस्यीय छत्तीसगड विधानसभेसाठी 21 आणि मध्य प्रदेशसाठी 39 उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही राज्यांमध्ये पुढील तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे.

- Advertisement -

केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक एक दिवस आधी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी दिल्लीत झाली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सीईसी सदस्य सहभागी झाले होते. काही कमकुवत जागांचे उमेदवार एक-दोन दिवसांत जाहीर होतील, अशी चर्चा होती.

एमपीतील हारलेल्या जागांचेच उमेदवार केले जाहीर

- Advertisement -

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या सर्व जागा सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. यापैकी बहुतांश जागा अशा आहेत जिथे भाजप सलग दोन वेळा निवडणूक हरलेले आहेत. तेव्हा या हारलेल्या जांगा कशा जिंकल्या जातील यावरच भाजपचा सर्वाधिक भर असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : Mallikarjun Kharge : राहुल – सोनिया गांधी यांनी मला काँग्रेस अध्यक्ष केले; खर्गेच्या वक्तव्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

छत्तीसगडमध्ये पहिल्या यादीत पाच महिला उमेदवार

भाजपने आज जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 5 महिलांना विधानसभेचे तिकीट दिले आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. भाजपने निवडणूक आयोगाच्या घोषणेआधीच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा हा पहिलाच प्रयोग केला आहे. पक्ष कमकुवत असलेल्या जागांवर आधी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आतापर्यंत भाजप निवडणूक जाहीर झाल्यानंतरच यादी जाहीर करत आहे.

- Advertisment -