घरदेश-विदेशगुजरातच्या ६ महापालिकांवर भाजपचे वर्चस्व, काँग्रेसला धक्का

गुजरातच्या ६ महापालिकांवर भाजपचे वर्चस्व, काँग्रेसला धक्का

Subscribe

पंतप्रधानांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा

गुजरातमध्ये २१ फेब्रुवारीला महापालिकेच्या ५७६ जागांवर निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीचे निकाल हाती आले आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद,सुरत,राजकोट,वडोदरा,जामनगर आणि भावनगर महानगरपालिकेवर भाजपने आपले वर्चस्व राखले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आणि काँग्रेसने आपली ताकद पणाला लावून चांगली तयारी केली होती. भाजपने गुजरात महापालिकेच्या निवडणुकीत एकूण ५७६ जागांपैकी ४९० तर काँग्रेसने ४८ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला भाजपने मोठा धक्का दिला असल्याचे दिसते आहे.

गुजरातच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच आम आदमी पार्टी व एमएमआयएमने पालिकांमध्ये प्रवेश केला आहे. सुरतमध्ये महानगरपालिका निवडणुकींमध्ये आम आदमी पक्षाने आपले खाते खोलत ८ महापालिकांवर वर्चस्व मिळवले आहे. तर पहिल्यांदाच असुद्दीच ओवैसींच्या एआयएमआयएमने अहमदाबादच्या ४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस सुरतमध्ये तीसऱ्या स्थानावर आहेत.

- Advertisement -

भाजपने गुजरातमधील महानगरपालिका निवडणूकीमध्ये जुन्या नेत्यांना हटवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये भाजपने मोठं यश मिळवले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा

गुजरात महापालिकांवर घवघवीत यश मिळाल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत मतदारांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, गुजरात महापालिका निवडणूक निकालातून लोकांचा विकासाच्या राजकारणावर विश्वास असल्याचे दिसून येते. भाजपावर पुन्हा विश्वास दाखवल्याबद्दल राज्यातल्या जनतेचा आभारी आहे. गुजरातची सेवा करणं ही नेहमीच सन्मानाची बाब आहे,असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

- Advertisement -


हेही वाचा : शिवसेनेला वचनपूर्तीची आठवण करून देण्यासाठी भाजपची मूक निदर्शने


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -