घरताज्या घडामोडीCorona Vaccine: जपानमध्ये मॉडर्ना लसीत आढळला काळा पदार्थ, दोन व्यक्तींचा मृत्यू

Corona Vaccine: जपानमध्ये मॉडर्ना लसीत आढळला काळा पदार्थ, दोन व्यक्तींचा मृत्यू

Subscribe

जपानमधील लसीमध्ये दुसऱ्या पदार्थाची भेसळ होत असल्याची समस्या कमी होताना काही दिसत नाही आहे. आता पुन्हा एकदा मॉर्डना लसीमध्ये परदेशी पदार्थ मिसळल्याची घटना समोर आली आहे. जपानमध्ये ज्या लसीच्या खेपेत इतर पदार्थांचे मिश्रण आढळले आहे, त्या खेपेतील लस घेणाऱ्या दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जपानने आता जवळपास एक मिलियन मॉडर्ना लसीचे डोस काढून टाकले आहे.

सध्या जपान कोरोनाच्या भयानक लाटेतून सफर होत आहे. संपूर्ण देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव पसरला आहे. यादरम्यान जपानने मॉर्डना लस निलंबित निर्णय घेतला असून याचा परिणाम एकूण २६ लाखांहून अधिक लोकांवर होणार आहे. देशात दररोज २५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. याच दरम्यान लसीत परदेशी पदार्थ भेसळ करण्याचे प्रकरणे टोकियो जवळील गुनमा प्रांत आणि ओकिनावच्या दक्षिणी प्रांतातून समोर आले आहे. त्यामुळे सरकारने रविवारी लसीचे दोन खेप निलंबित केल्या आहेत. यापूर्वी गेल्या आठवड्यात १.६३ मिलियन डोस काढून टाकले होते.

- Advertisement -

माहितीनुसार, गुनमामध्ये मॉडर्ना लसीच्या खेपेत काळा रंगाचा पदार्थ मिळाला होता. तर ओकिनावमध्ये सीरिंज आणि लसीच्या खेप या दोन्हींमध्ये काळ्या रंगाची काही पदार्थ आढळले होते. तसेच काही लसीच्या सीरिंजमध्ये एक गुलाबी रंगाचे मिश्रण दिसले होते. या पार्श्वभूमीवर जपानचे आरोग्य मंत्रालय म्हणाले की, लसीमध्ये वेगळे पदार्थ मिसळण्याच्या अशा घटना चुकीच्या सुई टाकल्यामुळे झाल्या आहेत. सीरिंज आतमध्ये घालताना त्यामधील असलेले रबर स्टॉपर तुटले आणि ते लसीच्या खेपेच्या आतामध्ये गेले.

शनिवारी सरकारने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, मॉडर्ना लस घेतलेल्या दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यानंतर लसीचे पूर्ण लॉट निलंबित केले आहेत. तसेच सध्या हे मृत्यू कसे झाले? याचा तपास केला जात आहे. जर लसीमध्ये दूषित पदार्थ मिसळल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला असेल तर लस घेणाऱ्या दुसऱ्या लोकांमध्ये काही लक्षणे आढळतील.

- Advertisement -

हेही वाचा – ‘रहस्यमय तापा’चा कहर: कोरोनानंतर यूपीमध्ये लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक; ही आहेत लक्षणे


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -