घरदेश-विदेशभयंकर! व्यवसायात नफा मिळण्यासाठी वडिलांकडून मुलीवर काळी जादू

भयंकर! व्यवसायात नफा मिळण्यासाठी वडिलांकडून मुलीवर काळी जादू

Subscribe

व्यवसायात नुकसान होत असल्याने एका इसमाने आपल्या मुलीवरच अघोरी विधी केला, त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

देश तंत्रज्ञानाच्या जोरावर विकसित होत आहे. जागतिक स्तरांवर देशाने मान उंचावलेली असतानाच देशातील अनेक ग्रामीण भागात आजही अंधश्रद्धा (Superstition) जपली जाते याच्या अनेक घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. त्यातच आंध्रप्रदेशमधूनही एक घटना समोर आली आहे. व्यवसायात नुकसान होत असल्याने एका इसमाने आपल्या मुलीवरच अघोरी विधी केला, त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. (Black magic on the daughter by the father to make a profit in the business)

हेही वाचा – संकल्प अंधश्रद्धा निर्मूलनाचा….गावाच्या विकासाचा!

- Advertisement -

देश पुरोगामी बनत असला तरीही अनेक गावात आजही अंधश्रद्धा जोपासली जाते. त्यामुळे अनेकदा निष्पाप लोकांचे नाहक बळीही जातात. असाच एक प्रकार आता हा प्रकार घडला आहे. व्यवसाय वाढीसाठी एकाने जादूटोण्याचा प्रकार केला. मात्र, या प्रकरामुळे त्याला त्याची मुलगी गमवावी लागली आहे.

हेही वाचा -चिकटलेल्या अंधश्रद्धांचे काय!

- Advertisement -

आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील पेरारेड्डीपल्ली गावात एक वेणुगोपाल नावाचा इसम आपल्या जुळ्या मुलींसोबत राहत होता. व्यवसायात नफा मिळवण्यासाठी त्याने विधीच्या नावाखाली जादूटोणा केला. यावेळी मुलीच्या अंगावर सुरुवातीला हळदीचे पाणी ओतले आणि नंतर तिच्या तोंडात कुंकू पावडर भरली. यामुळे तिचा श्वास गुदमरू लागला. म्हणून ती जोरजरात ओरडू लागली. त्यामुळे त्यांचे शेजारचे गोळा झाले. त्यांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. चेन्नईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा भिमाशंकरमध्ये भाविकांची अंधश्रद्धा उठतेय वृक्षांच्या जिवावर!

आरोपीचे नाव वेणुगोपाल असून त्याचा व्यवसाय होता. व्यवसायात खूप नुकसान झाल्याने त्याने जादूटोण्याचा प्रयोग केला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -