घरदेश-विदेशजम्मू काश्मीर: उधमपूरमध्ये आणखी एका बसमध्ये स्फोट, 8 तासांत दुसरी घटना; संशयित...

जम्मू काश्मीर: उधमपूरमध्ये आणखी एका बसमध्ये स्फोट, 8 तासांत दुसरी घटना; संशयित दहशतवादी कट

Subscribe

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये आणखी एका बसमध्ये गूढ स्फोट झाला आहे. वास्तविक, आज म्हणजेच गुरुवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास उधमपूर बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये मोठा स्फोट झाला, ज्याचा आवाज दूरदूरपर्यंत ऐकू आला. ही बस रामनगरजवळून उदयपूरला जात होती आणि रात्री बसस्थानकावर उभी होती. सध्या या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र जवळपासच्या बसेसचेही नुकसान झाले आहे.

येथे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या २४ तासांत उधमपूरमध्येच बस स्फोटाची ही दुसरी घटना आहे. याआधी काल बुधवारी रात्री 10.45 च्या सुमारास डोमेल चौकात बसमध्ये असाच गूढ स्फोट झाला होता, ज्यात दोन जण जखमी झाले होते. ही बस रामनगर ते बसंतगढ अशी जात होती. स्फोट इतका भीषण होता की बसचा चक्काचूर होऊन इकडे तिकडे विखुरला गेला.

- Advertisement -

जम्मू-काश्मीर पोलिसांचे आयजी मुकेश सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत 2 स्फोट झाले आहेत. उधमपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या बसमध्ये हे स्फोट झाले. एक स्फोट रात्री झाला, ज्यामध्ये 2 लोक जखमी झाले आणि दुसरा सकाळी उधमपूर बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसमध्ये झाला ज्यामध्ये कोणतेही नुकसान झाले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात दोन जण जखमी झाले असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलीस आणि इतर यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपासात सुरू आहे. प्रथमदर्शनी दहशतवादी कट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -