घरदेश-विदेशलुधियानात कोर्टामध्ये आत्मघातकी स्फोट? एनआयए, एनएसजीचे पथक दाखल

लुधियानात कोर्टामध्ये आत्मघातकी स्फोट? एनआयए, एनएसजीचे पथक दाखल

Subscribe

लुधियानातील जिल्हा कोर्टात गुरुवारी झालेला स्फोट हा आत्मघातकी हल्ल्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. पण याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या स्फोटाच्या तपासासाठी दिल्लीतून एनएसजी, नॅशनल बॉम्ब डाटा सेंटर आणि चंदीगडवरून एनआयएची दोन सदस्यांची टीम लुधियानात पोहोचत आहे. या स्फोटाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून रिपोर्ट मागितला आहे.

स्फोटाच्या घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा आणि पंजाबचे पोलीस महासंचालक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली. या घटनेनंतर पंजाबमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

लुधियानामध्ये दुपारी १२.२५ वाजता कोर्टाच्या तिसर्‍या मजल्यावर स्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन महिलांसह ३ जण गंभीर जखमी आहेत. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी लुधियानात पोहोचण्याच्या काही वेळ आधी हा स्फोट झाला. स्फोटात जखमी झालेल्या संदीप कौर (३१ वय) आणि शरणजीत कौर (वय २५) या दोन महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लुधियाना जिल्हा कोर्टाच्या इमारतीत तिसर्‍या मजल्यावर एका बाथरूममध्ये हा स्फोट झाला. या घटनेनंतर बाथरूममध्ये एक छिन्नविछिन्न झालेला मृतदेह आढळून आला. हा मृतदेह आत्मघातकी हल्ला करणार्‍याचा असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता फॉरेन्सिक टीम मृतदेहाची तपासणी करत आहे. यामुळे ठार झालेली व्यक्ती आत्मघाती हल्लोखोर होता की नाही? हे स्पष्ट होईल.

- Advertisement -

आत्मघातकी हल्लेखोराने केला स्फोट
ज्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे, त्याच्याकडेच स्फोटके होती, असे लुधियानाचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर म्हणाले. पण तो आत्मघातकी हल्लेखोर होता का? यावर ते काहीही बोलले नाही. पण स्फोटात ठार झालेली व्यक्ती ही घटनास्थळी स्फोटके पेरण्यासाठी आली होती आणि त्याचवेळी स्फोट झाला. आता या प्रकरणी गांभीर्याने तपास सुरू आहे, असे आयुक्त गुरप्रीत भुल्लर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -