घरताज्या घडामोडीधक्कादायक! बंगालमध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू

धक्कादायक! बंगालमध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू

Subscribe

फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. कारखान्यातील स्फोट इतका भीषण होता की, कामगार थेट शेजारच्या तलावात फेकले गेले. या स्फोटानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. कारखान्यातील स्फोट इतका भीषण होता की, कामगार थेट शेजारच्या तलावात फेकले गेले. या स्फोटानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी तलावात फेकले गेलेल्या कामगारांना बाहेर काढले. पण दुर्देवी त्यांचा मृत्यू झाला होता. (blast in West Bengal Egra of East Midnapore 9 dead bodies flew away to nearby lake due to explosion)

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील इग्रा येथील ब्लॉक क्रमांक १ मधील सहारा ग्रामपंचायत क्षेत्रातील खडीकुल गावात फटाक्यांचा कारखाना होता. विशेष म्हणजे हा बेकायदेशीर कारखाना असून तृणमूल काँग्रेसचे नेते कृष्णपद बाग उर्फ भानू बाग यांचा हा कारखाना होता. हा स्फोट झाला त्यावेळी कारखान्यातील कामगार शेजारी असलेल्या तलावात आणि रस्तावर फेकले गेले.

- Advertisement -

मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा स्फोट झाल्याचे समजते. या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या नऊ गाड्यांच्या सहाय्याने आग विझवण्यात आली. या घटनेत आतपर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून या सगळ्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. तसेच, आणखी मृतदेह सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक अमरनाथ यांनी घटनास्थळी भेट दिली असून, त्या भागातील आयसीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र स्थानिक नागरिक पोलिसांच्या कारवाईवर नाराज असून त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

- Advertisement -

या स्फोटात काही लोकांच्या हाता-पायाला गंभीर इजा झाली होती. तसेच, काही लोक उडून तलावात पडले होते. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता इतकी होती की, घराच्या छतावरून मृतदेह खाली पडून तलावात पडले.


हेही वाचा – गिरणी कामगारांच्या घरांसाठी समिती; ठाकरे गटाच्या आमदारांना डावलले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -