मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयाबाहेर मोठा स्फोट

मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयाच्या इमारतीवर संशयित रॉकेट पडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या स्फोट इतका भयंकर होतो की या स्फोटामुळे इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयाच्या इमारतीवर संशयित रॉकेट पडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या स्फोट इतका भयंकर होतो की या स्फोटामुळे इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या स्फोटोबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास मोहालीतील पंजाब इंटेलिजन्स कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळते. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तसंच, कोणतेही नुकसान झालेले नाही. पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या इमारतीवर रॉकेटने हल्ला करण्यात आला. ज्याने सर्वांनाच गोंधळात टाकले आहे. गुप्तचर विभागाची ही इमारत सुहाना साहिब गुरुद्वाराजवळ आहे.

याबाबत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी डीजीपींकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्याचबरोबर पंजाब पोलिसांनी आजूबाजूच्या भागात कडक बंदोबस्त ठेवला आहे. सेक्टर 77, एसएएस नगर येथील पंजाब पोलिस इंटेलिजन्स मुख्यालयाच्या बाहेर आज सकाळी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, याला दहशतवादी हल्ला मानता येईल का, असे विचारले असता, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे म्हणत त्यांनी काळजी व्यक्त केली. पंजाब पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवर या हल्ल्यामागे दहशतवाद्यांचा कट असू शकतो, असे आम्ही चौकशी करत असताना शक्यता व्यक्त केली जात असल्याची माहिती एसपी सिंह यांनी दिली.


हेही वाचा – नवनीत राणांच्या ‘एमआरआय’वर शिवसेनेचे सवाल; लिलावती रुग्णालय प्रशासनाला धरलं धारेवर