घरदेश-विदेशकराचीत चिनी दूतावासाजवळ बॉम्बस्फोट

कराचीत चिनी दूतावासाजवळ बॉम्बस्फोट

Subscribe

२ पोलिसांचा मृत्यू तर ३ दहशतवादी ठार

पाकिस्तानमधील चिनी दूतावासाजवळ बॉम्बस्फोट झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. देशातील सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणार्‍या कराचीतील क्लिफ्टन परिसरात स्फोट झाला. या स्फोटात आणि गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू झाला. यावेळी तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी दूतावासमध्ये घुसखोरी करण्यात यशस्वी झाले. त्यांनी इमारतीच्या गच्चीवर जाऊन पोलिसांना निशाणा बनवले आहे.

कराचीतील ‘रेड झोन’मध्ये स्फोट

पाकिस्तानमधील कराचीतील या परिसराला ‘रेड झोन’ असे म्हटले जाते. जगातील अनेक देशांची कार्यालये याठिकाणी आहेत. त्यामुळे सर्वाधिक सुरक्षा व्यवस्था या परिसरात ठेवली जाते. तरीही ३ ते ४ हल्लेखोरांनी चिनी दूतावासाच्या कार्यालयात घुसखोरी केली. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा हल्ला घडविण्यात आला. दरम्यान, हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याबाबत अद्याप माहिती नाही. पाकिस्तानमधील सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळाला घेराव घातला असून पोलीसही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisement -
हंगू शहरात १७ ठार, ३० जखमी

खैबर पख्तूनख्वातील हंगू हे शहर स्फोटाने हादरले आहे. या स्फोटात 17 लोकांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिसराला चारही बाजूंनी घेराव घातला आहे. स्फोट कसा झाला, याचा पोलीस तपास करत आहेत. स्थानिक न्यूज चॅनेल जिओ टीव्हीच्या माहितीनुसार, एका धार्मिक स्थळाबाहेर स्फोट झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -