घरताज्या घडामोडीCoronavirus: चिंता वाढली! आता कोरोना रुग्णांच्या पोटात होतोय रक्तस्राव

Coronavirus: चिंता वाढली! आता कोरोना रुग्णांच्या पोटात होतोय रक्तस्राव

Subscribe

देशभरात अद्यापही कोरोनाचा कहर कायम आहे. पण यादरम्यान कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांना अनेक गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. यामध्ये बुरशीजन्य आजार, आताड्यांमध्ये छिद्रे, गँगरीन याशिवाय पोटात रक्तस्राव होण्याच्या केसेस आढळत आहेत. या रुग्णांच्या आतड्यांमध्ये छिद्रे होत आहेत. तसेच आता पोटात दुखणे, पचन न होणे यासारखे अचानक होणारी लक्षणे एक गंभीर संकेत देत आहेत. अशा प्रकारचे रुग्ण मुंबई, दिल्लीसह देशातील विविध राज्यांमध्ये आढळले आहेत.

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयामध्ये अशा प्रकारचे ५० ते ६० रुग्ण दाखल झाले आहेत. जे पहिल्या लाटेच्या तुलनेत १२० टक्के जास्त आहेत. या रुग्णालयाचे वरिष्ठ डॉ. अनिल अरोरा म्हणाले की, ‘अचानकपणे पोटात वेदना झाल्यामुळे तात्काळ तपासणी करणे गरजेचे आहे. गेल्या तीन आठवड्यात त्यांच्या इथे प्रत्येक दिवसाला ४ ते ५ अशी लक्षणे असलेले रुग्ण आले आहेत, ज्यांना त्वरित दाखल करावे लागले. यामध्ये काही रुग्ण असे आहेत, ज्यांचे ऑपरेशन केल्यानंतर प्राण वाचले आहेत.’

- Advertisement -

दिल्लीप्रमाणे मुंबईतील सिटी रुग्णालयत अशा प्रकारचे रुग्ण आढळले आहेत. सिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोक सिंह म्हणाले की, ‘सातत्याने रुग्णालयात अशा प्रकारचे रुग्ण आढळत आहेत. महत्त्वाचे म्हणजे ३० ते ३५ वर्षांच्या वयोगटातील रुग्णांमध्ये अशा प्रकारची लक्षणे आढळत आहेत. लोकं पोट दुखणे हे हलक्यात घेतात. त्यांना ही अॅसिडीटी किंवा काही चुकीचे खाल्ल्यामुळे झाले असावे वाटते. परंतु जर पोटातील वेदना दोन दिवसांपेक्षा अधिक काळ असेल तर त्वरित तपास करावा. कारण कोरोना संक्रमणाच्या पोस्ट कोविड प्रभावांबद्दल अधिक माहिती नाही आहे.’

एक्यूट मेसेन्ट्रिक इस्कीमिया लहान आतड्यांच्या भागातील रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो, ज्यामुळे गँगरीन होतो. याशिवाय बुरशीचा परिणाम आतड्यांवर होताना दिसत आहे. तसेच आतड्यात छिद्रे झाल्यामुळे ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते.

- Advertisement -

दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, ‘देशात आता पोस्ट कोविड उपचारावर अधिक लक्ष्य दिले जाणे गरजेचे आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा परिणाम अधिक झाला आहे.’


हेही वाचा – Corona: पॉझिटिव्ह बातमी! दक्षिण आफ्रिकेचा घातक व्हेरियंट झाला गायब


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -