Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Hindenburg Vs Block Ink: हिंडेनबर्गला ब्लाॅक इंकचा धक्का; लढणार कायदेशीर लढाई

Hindenburg Vs Block Ink: हिंडेनबर्गला ब्लाॅक इंकचा धक्का; लढणार कायदेशीर लढाई

Subscribe

हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांनंतर आता ब्लाॅक इंकने हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील आरोपांचे खंडन केले आहे. ब्लाॅक इंकने हिंडेनबर्गविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकन शाॅर्ट सिलिंग कंपनी हिंडेनबर्गने पुन्हा एकदा अहवाल प्रसिद्ध केला आहे. हिंडेनबर्गने या कंपनीने यावेळी अमेरिकन व्यावसायिक जॅक डोर्सी यांना लक्ष्य केले आहे. जॅक डोर्सी यांची पेमेंट कंपनी ब्लाॅक इंकवर फसवणूक, खात्यात फेरफार, सरकारी मदतीचा गैरवापर असे आरोप केले आहेत.

या आरोपांनंतर आता ब्लाॅक इंकने हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील आरोपांचे खंडन केले आहे. ब्लाॅक इंकने हिंडेनबर्गविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या कॅश अॅप बिझनेसवर हिडेनबर्गचा अहवाल तथ्यात्मक रुपात चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे ब्लाॅक इंकने सांगितले. हिंडेनबर्गच्या अहवालाची समिक्षा केल्यानंतर ब्लाॅक इंकने सांगितले की, हा अहवाल गुंतवणूकदारांना धोका देण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी बनवण्यात आला आहे.

- Advertisement -

बुधवारी अमेरिकन शाॅर्ट सेल हिंडेनबर्गने ब्लाॅक इंकवर रियल यूजर्स संख्या फुगवल्याचा आरोप केला आहे. ब्लॅक इंकचे सीईओ जॅक डोर्सीवर कोरोना महामारी दरम्यान अब्जाधीश डाॅलर्सचे शेअर्स विकून पैसे कमावल्याचा आरोप केला आहे.

( हेही वाचा: ट्विटर युजर्ससाठी वाईट बातमी, ‘या’ तारखेपासून हटवणार ‘ब्लू टिक’ )

- Advertisement -

हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ब्लाॅक इंकचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांनी फसवणूक करुन 1 अब्ज डाॅलर्सपेक्षा अधिक स्टाॅक्सची विक्री केली आहे. ब्लाॅकने सांगितले की, कायदेशीर कारवाई करताना, अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आणि विनिमय आयोगासह काम करण्याची आमची तयारी आहे. या रिपोर्टनंतर ब्लाॅकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांपर्यंत घसरले. कंपनीला काही तासांतच 80 हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

कोण आहेत जॅक डोर्सी?

जॅक मायक्रोब्लाॅगिंग प्लॅटफाॅर्म ट्विटरचे सहसंस्थापक आहेत. 2015 ते 2021 पर्यंत त्यांनी ट्वीटरची जबाबदारी सांभाळली. 2021 मध्ये ट्वीटर सोडल्यानंतर ब्लूस्काय हे नवीन प्लॅटफाॅर्म लाॅन्च केले. ट्वीटरशी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी ब्लूस्काय अॅप लाॅंच केले. या अॅपद्वारे युजर्स ट्वीटरप्रमाणे फाॅलो करु शकतात. त्यानंतर त्यांनी ब्लाॅक अॅप लाॅंच केले. या अॅपद्वारे कोरोनाच्या काळात 5.1 कोटींहून अधिक व्यवहार झाले. जॅक यांचा जन्म 1976 मध्ये अमेरिकेतील सेंट लुईस येथे झाला. त्यांनी मध्येच शिक्षण सोडले आणि प्रोग्रामर म्हणून काम करु लागले.

- Advertisment -