घरदेश-विदेशA पॉझिटिव्ह रक्तगटही आता युनिवर्सल डोनर

A पॉझिटिव्ह रक्तगटही आता युनिवर्सल डोनर

Subscribe

O पॉझिटिव्हसह A पॉझिटिव्ह रक्तगटही कोणत्य़ाही रुग्णाला चालणार

जगात सध्या O पॉझिटिव्ह रक्तगटाला युनिवर्सल डोनर म्हटले जाते. म्हणजेच O पॉझिटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त कोणत्याही गटाच्या व्यक्तीला रक्त देऊ शकतात. परंतु आता A पॉझिटिव्ह रक्तगटालाही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे A पॉझिटिव्ह रक्तगटातील रक्तही कोणत्याही रक्तगटातील व्यक्तीला चालणार आहे. कॅनडामधील वैज्ञानिकांनी खास करुन बॅक्टेरियल एंजाइमचा वापर करत A पॉझिटिव्ह रक्तगटालाही युनिवर्सल डोनर म्हणून मान्यता मिळाली आहे.

यामुळे जगभरात रक्ताच्या तुटवड्यामुळे वाढणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटणार आहे. त्यामुळे O पॉझिटिव्हसह A पॉझिटिव्ह गटालाही मान्यता मिळाल्याने O पॉझिटिव्ह रक्तगटाचा साठा कमी झाल्यास रुग्णावर A पॉझिटिव्ह रक्तगटाचा वापर करता येणार आहे. अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये गंभीर सर्जरी, शेड्युल्ड ऑपरेशन आणि रुटीन ट्रान्सफ्यूजनसाठी दिवसाला १६,५०० लीटर रक्ताची आवश्यकता असते. परंतु रुग्णावर ठरावीक रक्त गटाचा वापर करु शकत असल्याने अनेकदा रक्ताचा तुटवडा जाणवतो. पण आता वैज्ञानिकांनी व्यक्तीच्या शरारीमधील माइक्रोब्सचा शोध घेतला जो दोन प्रकारचे एंजाइम स्त्राव करतात.

- Advertisement -

या एंजाइमच्या मदतीने वैज्ञानिकांनी टाइप-A म्हणजेच A पॉझिटिव्ह रक्तगटालाही युनिवर्सल डोनर म्हणून मान्यता दिली. मॅरिलॅंड स्थित नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थ क्लिनिकल सेंटरमधील ब्लड ट्रांसफ्यूजन एक्सपर्ट हार्वे क्लेन सांगतात की, जगात हा प्रयोग पहिल्यांदाच केला जात आहे. या प्रयोगाला मोठ्य़ाप्रमाणात यश आल्यास हा मेडिकल सायन्समधील  सर्वात मोठे पाऊल असणार आहे. व्यक्तींमध्ये A, B, AB आणि O असे चार प्रकारचे रक्तगट आढळतात. या रक्तगटांच्या लाल रंगाच्या पेशीत (RBC) असणाऱ्या शुगर मॉलीक्यूल्स कणांमधून ठरावीक रक्त गट ओळखता येतो. एखाद्या A पॉझिटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीला B पॉझिटिव्ह रक्त चढवलेत त्यामध्ये शुगर मॉलिक्यूल्स कण ज्य़ाला ब्लड एंटीजन म्हणतात ते RBC वर परिणाम करतात. यामुळे इम्यून सिस्टमचे काम बंद पडते व रुग्णांचा मृत्यू होतो.

O पॉझिटिव्ह रक्तगटामध्ये एंटीजनचे प्रमाण कमी असते. यामुळे या रक्तगटाला युनिवर्सल डोनर म्हणून मान्य़ता मिळाली. अनेक रुग्णालयांमध्ये O पॉझिटिव्ह रक्त गटाची अधिक मागणी असते. कारण अगदी गंभीर अवस्थेत ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णाच्या रक्तगटाची तपासणी करण्यासाठी वेळ नसतो. यावेळी युनिवर्सल डोनर म्हणून O पॉझिटिव्ह रक्त वापरले जाते. त्यामुळे अमेरिकेसह जगभरात O पॉझिटिव्ह रक्ताची कमी भासते. यासाठी कॅनडामधील वैज्ञानिकांनी A पॉझिटिव्ह रक्तगटावर अभ्यास करत यातील एंटीजन काढू शकले. परंतु या प्रयोगाला पूर्णपणे यश आले नाही. परंतु चार वर्षाच्या प्रयत्नांनंतर कॅनडा वँकूवर स्थित युनिवर्सिटी ऑफ ब्रिटिस कोलंबियाचे केमिकल बायोलॉजिस्ट स्टीफन विथर्स यांनी दोन एंजाइम्सचा शोध घेत ब्लड ग्रुप A ला युनिवर्सल डोनरमध्ये बदलण्यात यश मिळवले.

- Advertisement -

हे बॅक्टेरिअस एंजाइम्स ब्लड ग्रुप A मधील लाल रक्त पेशींवरील साखरेच्या थराला खाते. शरीरातील लाल रक्त पेशांच्यावरील साखरेच्या थराला म्युसिंस म्हणतात. या प्रयोगासाठी युनिवर्सिटीचे पोस्ट डॉक्टोरल रिसर्चर पीटर राफेल्ड यांनी व्यक्तीच्या मळीचा सँपेल घेतले. यामधून DNA वेगळा केला. यानंतर अशा जीन्सचा शोध घेतला की जो म्युसिंसला खाणाऱ्या एंजाइमचा शोधा घेतला. म्हणजेच ब्लड ग्रुप A मधील म्युसिंसला कमी करण्यासाठी आता या एंजाइम्सची मदत घेतली जाणार आहे. या एंजाइम्सला जेव्हा ब्लड ग्रुप A मधील लाल रक्त पेशांमध्ये मिसळवण्यात आले तेव्हा हा प्रयोग यशस्वी झाला. हा प्रयोग नेचर माइक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे. सध्या अमेरिकेत ब्लड ग्रुप A चा फक्त तीन टक्के साठा उपलब्ध आहे. परंतु जर ब्लड ग्रुप A ला आता युनिवर्सल डोनर म्हणून घोषित केल्यास देशात रक्ताचा पुरवठा दुप्पट होईल. त्य़ामुळे रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही.

अद्याप या प्रयोगाच्या आणखी चाचण्या करणे गरजेचे आहे. कारण शोधण्यात आलेला एंजाइम लाल रक्त पेशांवरील साखरेचा थर कमी करत असेल तर याचा शरारीवर काही परिणाम तर होणार नाही ना याचा अधिक अभ्यास झाला पाहिजे. कारण असे न करता जर वापर करण्यास सुरुवात झाल्या व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -