घरदेश-विदेशBNP Recruitment 2021: सुपरवायझर, वेलफेअर ऑफिसरसह १३५ विभिन्न पदांची भरती; १ लाखापर्यंत...

BNP Recruitment 2021: सुपरवायझर, वेलफेअर ऑफिसरसह १३५ विभिन्न पदांची भरती; १ लाखापर्यंत मिळणार पगार

Subscribe

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना अनेक राज्यात लॉकडाऊन केले. गेल्या वर्षी लॉकडाऊनदरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर कित्येक जण बेरोजगार झाले. त्यामुळे सामान्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत नोकरीची सुवर्ण संधी बँक नोट प्रेस, देवास येथे आहे. बँक नोट प्रेस, देवास (बीएनपी) यांनी वेलफेयर अधिकारी, पर्यवेक्षक (सुपरवायझर), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (जूनिअर ऑफिस असिस्टंट) आणि कनिष्ठ तंत्रज्ञ (जूनिअर टेक्नीशिअन ) या पदासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी पात्र व इच्छुक असलेले उमेदवार १२ मे ते ११ जून २०२१ या कालावधीत अधिकृत वेबसाइट bnpdewas.spmcil.com वर अर्ज करू शकतात.

बीएनपीमध्ये सुपरवायझर, वेलफेअर ऑफिसरसह १३५ विभिन्न पदांची भरती होणार असून वेलफेअर ऑफिसर या पदाकरता १ जागा, सुपरवायझर २ पद, जूनिअर ऑफिस असिस्टंट एकूण १५ पद आणि जूनिअर टेक्नीशिअन या पदाकरता ११३ पदांची जागा आहे. तर भारत सरकार Mint नोयडा येथे सेक्रेटेरिअल असिस्टंटकरता १ पद आणि जूनिअर ऑफिस असिस्टेंटकरता ३ पदांकरता ही भऱती असणार आहे. वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज १२ मे २०२१ पासून करू शकतात. हा ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२१ पर्यंत आहे. या पदांसाठी अर्ज केल्यानंतर जुलै किंवा ऑगस्टमध्ये स्टेनोग्राफी परीक्षा आणि टायपिस्ट परीक्षा घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर या ऑनलाईन परीक्षा तारीख जुलै / ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे.

कोणत्या पदाकरता किती असणार पगार

  • जूनिअर ऑफिस असिस्टंट – २१ हजार ५४० – ७७ हजार १६० रुपये
  • जूनिअर टेक्नीशिअन – १८ हजार ७८० – ६७ हजार ३९० रुपये
  • सेक्रेटेरिअल असिस्टंट – २३ हजार ९१० – ८५ हजार ५७० रुपये
  • वेलफेअर ऑफिसर – २९ हजार ७४० – १ लाख ३ हजार रुपये
  • सुपरवायझर – २७ हजार ६०० – ९५ हजार ९१० रुपये

कोणत्या पदाकरता किती वयाची अट

  • जूनिअर ऑफिस असिस्टंट – २८ वर्ष
  • जूनिअर टेक्नीशिअन – २५ साल
  • सेक्रेटेरिअल असिस्टंट – २८ वर्ष
  • वेलफेअर ऑफिसर – ३० वर्ष
  • सुपरवायझर- ३० वर्ष
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -