ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींची भीषण धडक, १०० प्रवाशांपैकी अनेक बेपत्ता

बोट बुडायाला आल्यावर काही प्रवाशांना दुसऱ्या बोटीच्या सहाय्याने वाचवण्यात यश

Boat accident in Brahmputra river 40 people have been rescued
ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींची भीषण धडक, १०० प्रवाशांपैकी अनेक बेपत्ता

असामच्या जोरहट जिल्ह्यातील ब्रम्हपुत्रा नदीत दोन बोटींची भीषण धडक झाली आहे. या धडकेमध्ये १०० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटल्यामुळे मोठा अपघात घडला आहे. या दुर्घटनेत अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत. तर काही नागरिकांना वाचवण्या बचावकार्याला यश आलं आहे. बोट बुडतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या व्हिडिओमधून दुर्घटना भीषण असल्याचे दिसून आलं आहे. एका खासगी बोटीने सरकारी बोटीला धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून बुडालेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. रात्र झाल्यामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. बुडालेल्या बोटीचे नाव मा कमला असे आहे.

ब्रम्हपुत्रा नदीतील निमाटी घाटाजवळ या बोटींची धडक झाली आहे. सरकारी मालकीची बोट त्रिपकाई माजुलीहून येत असताना या बोटीची टक्कर झाली आहे. अंतर्देशीय जल वाहतूक (IWT) विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मा कमला बोट बुडाली आहे. बोटीमध्ये १०० ते १२० प्रवाशी उपस्थित होते. बोट बुडायाला आल्यावर काही प्रवाशांना दुसऱ्या बोटीच्या सहाय्याने वाचवण्यात यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकूण ४१ नागरिकांना वाचवण्यात यश आलं आहे. सुदैवाने आतापर्यंत एकही मृतदेह सापडला नसल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. परंतु या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला हे अद्याप कळू शकले नाही आहे.

बोटीमध्ये चारचाकी, दुचाकी वाहने

दुर्घटनेत बुडालेल्या बोटीमध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहने होती. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी असून बचावकार्य जोमाने सुरु ठेवण्यात आलं आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी घटनास्थळी बचावकार्य वेगाने करण्याचे निर्देश एसडीआरएफ आणि एनडीआरएफला दिले आहेत. तसेच या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्रधान सचिवांना या घटनेवर सर्वोतोपरी लक्ष देण्यास सांगितले असून मंत्री बिमल यांना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिलं आहेत.

पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रम्हपुत्रा नदी बोट बुडाल्याच्या दुर्घटनेवर ट्वीट करत दुःख व्यक्त केलं आहे. तसेच प्रवाशांची सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासनही दिलं आहे.