घरदेश-विदेशसियाचीनमध्ये तब्बल 38 वर्षांनी सापडला भारतीय जवानाचा मृतदेह!

सियाचीनमध्ये तब्बल 38 वर्षांनी सापडला भारतीय जवानाचा मृतदेह!

Subscribe

नवी दिल्ली : सियाचीन येथील एका जुन्या बंकरमध्ये एका भारतीय जवानाचा मृतदेह सापडला. 38 वर्षांपूर्वी आलेल्या हिमवादळात तो बेपत्ता झाला होता. चंद्रशेखर हर्बोला असे या जवानाचे नाव असून तो 19 कुमाऊं रेजिमेंटचा होता. रानीखेतच्या सैनिक ग्रुप केंद्रातर्फे त्याच्या कुटुंबीयांना चंद्रशेखर हर्बोला यांचा मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली.

जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनवर पाकिस्तान लष्कराचा डोळा होता. पण ते काही हालचाल करण्यापूर्वीच 29 मार्च 1984 रोजी ऑपरेशन मेघदूत मोहीम राबून भारतीय लष्कराने त्याचा ताबा घेतला होता. त्यावेळी 20 जवानांची एक तुकडी तिथे पाठविण्यात आली होती. तिथे गस्त सुरू असताना हिमवादळ आले आणि हे सर्व जवान त्यात दबले गेले. त्यानंतर घेतलेल्या शोधकार्यात त्यातील 15 जवानांचे शव हाती लागले होते. उर्वरित पाचपैकी एक चंद्रशेखर हर्बोला हा जवान होता.

- Advertisement -

हल्दवानीचे उपजिल्हाधिकारी मनीष कुमार आणि तहसिलदार संजय कुमार यांनी येथील सरस्वती विहार कॉलनीत राहणाऱ्या चंद्रशेखर यांच्या पत्नी शांती देवी यांना याबाबतची माहिती दिली. चंद्रशेखर हर्बोला जेव्हा बेपत्ता झाले तेव्हा त्या 28 वर्षांच्या होत्या आणि त्यांच्या लग्नाला नऊ वर्षं झाली होती. त्यांना दोन मुली आहेत. त्यावेळी त्यातील मोठी मुलगी चार वर्षांची तर, दुसरी मुलगी दीड वर्षांची होती. 1984मध्ये ते ड्युटीसाठी घराबाहेर पडले तेव्हा, लवकरच परत येईन असे आश्वासन त्यांनी दिले होते. पण मला पतीचा अभिमान आहे; कारण त्यांनी कुटुंबाला दिलेल्या वचनांपेक्षा देशाच्या सेवेला प्राधान्य दिले, असे शांती देवी म्हणाल्या.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -