घरताज्या घडामोडीChina plane crash: चीनमध्ये मोठी दुर्घटना; 133 प्रवासी असलेले Boeing 737 विमान...

China plane crash: चीनमध्ये मोठी दुर्घटना; 133 प्रवासी असलेले Boeing 737 विमान कोसळलं

Subscribe

दक्षिण चीनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. चीनचे बोईंग ७३७ (Boeing 737) विमान कोसळल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेच्या वेळी बोईंग ७३७ या विमानातून एकूण १३३ प्रवासी प्रवास करत होते. न्यूज एजेन्सी रॉयटर्सच्या मते, चीनचे बोईंग विमान Kunming हून Guangzhou कडे जात होते. यादरम्यान Guangxi भागात ही दुर्घटना घडली. यामुळे डोंगराळ भागातून आगीचे लोट बाहेर पडताना दिसत आहे. या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झालाय आणि किती जण जखमी झालेत? याबाबत अद्याप माहिती अस्पष्ट आहे. घटनास्थळी बचाव पथक पोहोचले असून या दुर्घटनेमागच्या कारणाचा तपास केला जात आहे.

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनुसार, ‘बोईंग विमानाने नैऋत्यच्या युन्नान प्रांतातील कुनमिंग विमानतळावरून दुपारी १.१५ वाजता उड्डाण केले होते. त्यानंतर दक्षिण चीनच्या गुआंगडोंग प्रांताच्या गुआंगझू विमानतळावर ३.०७ वाजता लँड होणार होते.’ दुसऱ्या सरकारी वृत्त एजेंसी शिन्हुआ ने सांगितले की, ‘बचाव कार्याचे पथक रवाना झाले आहे. या घटनेबाबात चायना ईस्टर्न एअरलाईन्ससोबत अजूनपर्यंत संपर्क झाला नाहीये.’

- Advertisement -

- Advertisement -

डोंगराळ भागात दुर्घटनेमुळे लागली आग

Guangzhouच्या आपात्कालीन व्यवस्थापनेकडून सांगण्यात आले आहे की, बोईंग ७३७ विमान ज्यामध्ये १३३ प्रवासी प्रवास करत होते, त्याची डोंगराळ भागात दुर्घटना घडली. यामुळे डोंगराळ परिसरात आग लागली आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे.

दरम्यान छोट्या आणि मध्यम अंतरावरील हवाई प्रवासासाठी बोईंग ७३७ विमान चांगले असल्याचे म्हटले जाते. तसेच China Eastern चीनच्या तीन मुख्य एअरलाईन्स कंपन्यांपैकी एक आहे. बोईंग विमानात १६२ जागांची क्षमता आहे. यामध्ये १२ जागा बिझनेस क्लास आणि १५० जागा इकोनॉमी क्लासच्या आहेत.

दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या विमानाची कराचीत Emergency Landing

दिल्लीहून दोहाला जाणारे विमान पाकिस्तानच्या कराचीमध्ये आपत्कालीन परिस्थितीमुळे आज सकाळी साडेपाच वाजता उतरविण्यात आले. कतार एअरवेजचे हे विमान आहे. (Qatar Airways QR579) Cargo मधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कतार एअरवेजने सांगितले आहे. सध्या विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने कराचीहून पुढे पाठविले जात आहे. या विमानातून जवळपास १०० प्रवासी प्रवास करत होते. या घटनेच्या चौकशीचे आदेश आता देण्यात आले आहेत.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -