घरअर्थजगतनोटाबंदी फसली? बोगस नोटांचा बाजारात पुन्हा सुळसुळाट

नोटाबंदी फसली? बोगस नोटांचा बाजारात पुन्हा सुळसुळाट

Subscribe

२०१८ ते २०२० च्या दरम्यान देशात दोन हजारांच्या सर्वाधिक बोगस नोटा सापडल्या होत्या. म्हणजेच नोटाबंदीच्या अवघ्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षीच देशात बोगस नोटांचा सुळसुळाट वाढला. त्यामुळे नोटाबंदी योजना सपशेल अयशस्वी ठरली असं म्हटलं जात आहे.

बाजारातील बोगस नोटांचा नायनाट व्हावा, काळ्या पैशांवर निर्बंध लागावेत आणि दहशतवाद्यांकडे जाणारा पैसा रोखावा याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये नोटाबंदी जाहीर केली होती. मात्र, नोटाबंदीच्या सहा वर्षांनंतरही बाजारात बोगस नोटांचा सुळसुळाट वाढला आहे. महत्त्वाचं म्हणजे याची माहिती खुद्द सरकारनेच लोकसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान दिली. (Bogus notes in the market again in India after Demonetization)

२०१८ ते २०२० च्या दरम्यान देशात दोन हजारांच्या सर्वाधिक बोगस नोटा सापडल्या होत्या. म्हणजेच नोटाबंदीच्या अवघ्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षीच देशात बोगस नोटांचा सुळसुळाट वाढला. त्यामुळे नोटाबंदी योजना सपशेल अयशस्वी ठरली असं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जप्त केलेल्या 2,000 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत वाढ

२०१८-२० दरम्यान दोन हजारांच्या बोगस नोटांचं प्रमाण वाढलं, अशी माहिती अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिली. २०१६ मध्ये दोन हजारांच्या दोन हजार २७२ बोगस नोटा जप्त करण्यात आल्या. तर, २०१७ मध्ये ७४ हजार ८९८ बोगस नोटा सापडल्या. पण, २०१८ मध्ये हे प्रमाण कमी होऊन ५४ हजार ७७६ पर्यंत पोहोचलं. तर, २०१९ मध्ये दोन हजाराच्या ९० हजार ५५६ नोटा जप्त केल्या तर, २०२० मध्ये हेच प्रमाण थेट २ लाख ४४ हजार ८३४ वर गेलं.

- Advertisement -

दरम्यान, २०२० नंतरच्या बोगस नोटांची आकडेवारी मोदी सरकारने जाहीर केली नाही. बँकिंग यंत्रणेत २०२१-२२ मध्ये दोन हजाराच्या १३ हजार ६०४ बोगस नोटा आढळून आल्या. तर, व्यवहारात असलेल्या एकूण नोटांमध्ये ०.०००६५३ टक्के नोटा बोगस असल्याचं म्हटलं जातंय.

आरबीयआचाही अहवाल

देशात बोगस नोटांचं प्रमाण वाढलं असल्याचा अहवाल मे महिन्यात आरबीआयनेही दिला होता. ५०० रुपयांच्या बोगस नोटांचं प्रमाण १०१.९ टक्क्यांनी वाढलं तर दोन हजारांच्या नोटांचं प्रमाण ५४.१६ टक्क्यांनी वाढलं असल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं होतं.

दोन हजारांच्या नोटा चलनातून कमी?

२०१९ मध्ये २ हजारांच्या नोटांची एकूण संख्या ३२ हजार ९१० होती, असा आरबीआयचा अहवाल आहे. तर, २०२१ मध्ये हे प्रमाण २४ हजार ५१० रुपयांपर्यंत कमी झालं. ३० लाख कोटी रुपयांच्या एकूण चलनात २ हजारांच्या नोटांचे मूल्य २०१९ मध्ये ६ लाख ५८ हजार कोटी होते. एका वर्षांनंतर २०२० मध्ये ते ४ लाख ९० हजार कोटींवर गेले. ३१ मार्च २०२१ च्या आकडेवारीनुसार देशात दोन हजार आणि ५०० रुपयांच्या ८५ टक्के नोटा चलनात होत्या. तर उर्वरित १५ टक्के नोटा १०,२०, ५० आणि १०० रुपयांच्या होत्या. २००० रुपयांच्या नोटांमुळे छोट्या व्यवहारात अडचणी येतात. म्हणूनच, २००० च्या तुलनेत ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांचे चलन वाढल्याचं स्पष्ट झालंय.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -