Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश "रडणं बंद करा...", सीएम योगींचा व्हिडीओ शेअर करत कंगना रणौतचा निशाणा

“रडणं बंद करा…”, सीएम योगींचा व्हिडीओ शेअर करत कंगना रणौतचा निशाणा

Subscribe

कंगना रणौत ही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा वापर केवळ फोटो शेअर करण्यासाठीच नाही तर लोकांना टार्गेट करण्यासाठी देखील करते.

कंगना रणौत ही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा वापर केवळ फोटो शेअर करण्यासाठीच नाही तर लोकांना टार्गेट करण्यासाठी देखील करते. अलीकडेच तिने शेअर केलेल्या एका पोस्टला उत्तर प्रदेशातील अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्या प्रकरणाशी संबंध जोडू पाहत आहेत. तिने या पोस्टमध्ये स्पष्टपणे काहीही लिहिले नसले तरी सीएम योगींच्या फोटोवरून आणि धर्म-अधर्माच्या उल्लेखावरून तिचा इशारा कुणाकडे आहे, याबाबत लोकांनी अंदाज लावण्यास सुरूवात केली आहे.

कंगना रणौतने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये सीएम योगींचा एक फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करत तिने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “धर्मग्रंथ सांगतात की धर्माची स्थापना केवळ धर्माचे पालन केल्याने होत नाही, तर अधर्माचा नाशही होतो.” फोटोमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ फोनवर कोणाशी तरी बोलताना दिसत आहेत. “तुम्ही रडणं बंद करा, माझ्याकडे इथपर्यंत आवाज येत आहे…अयोध्येला तपस्वी राजांची परंपरा आहे ज्यांनी भारताला वाचवले… जय श्री राम”, अशी कॅप्शन यासोबत कंगनाने लिहिली आहे.

- Advertisement -

Kangana Ranaut CM Yogi

तर दुसऱ्या आणखी एका स्टोरीमध्ये कंगनाने सीएम योगी यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. “योगीजींनी पहिल्याच भेटीत सांगितले की, तू माझी बहिण आहेस, तुझ्या सुरक्षेची जबाबदारी माझी आहे. तुला काही समस्या असल्यास मला कळव. अशा महान आणि सज्जन योगीजी, तुमचे यश आणि कीर्ती जगभर पसरो.’, असं तिने या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

- Advertisement -

यूपीच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक
याशिवाय तिने तिसरी स्टोरी शेअर केली असून यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, “मला उष्णता कशी बाहेर काढायची हे माहित आहे, मे असो किंवा जून, थंड कसे करायचं हे मला माहित आहे.”, असं योगी आदित्यनाथ या व्हिडीओमध्ये बोलताना दिसून येत आहेत. अतीक अहमद आणि त्याच्या भावाच्या हत्येवरून कंगना रणौतची ही प्रतिक्रिया आली असावी, असा लोकांचा अंदाज आहे. काल रात्री यूपीचा हा बाहुबली अतीक अहमद आणि त्याच्या भावाची तीन तरुणांनी गोळ्या झाडून हत्या केली.

- Advertisment -