घरदेश-विदेशJAYA BACHCHAN ...आम्ही काही शाळेतील मुले नाही, खासदार जया बच्चन का संतापल्या?

JAYA BACHCHAN …आम्ही काही शाळेतील मुले नाही, खासदार जया बच्चन का संतापल्या?

Subscribe

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांच्या भडकण्याचे किस्से काही नवीन नाहीत. गेल्या काही काळात सातत्याने त्या कोणावर तरी संतापलेल्या दिसतात. नुकताच राज्य सभेतील जया बच्चन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, त्यात त्या थेट सभापतींवरच चिडल्याचं दिसत आहे.

प्रसार माध्यमांसोबतचा संवाद किंवा एखाद्या गोष्टीवर राज्यसभेत मत मांडणं असो, ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखल्या जातात. चित्रपटातून ब्रेक घेतल्यानंतर जया बच्चन या राजकारणात सक्रिय झाल्या. समाजवादी पार्टीच्या खासदार म्हणून जया बच्चन सध्या राज्यसभेवर गेल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – MNS : हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का? मनसेचा अजित पवारांना टोला

राज्यसभेत नेमकं काय घडलं ?

राज्यसभेत प्रश्नोत्तरांचं सेशन सुरू असताना एका प्रश्नाच्या वेळी विरोधकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. दरम्यान, सभापतींनाही बोलू न दिल्याने जया बच्चन चांगल्याच खवळल्या. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांनी प्रश्न क्रमांक १७ नंतर पुढील १८ व्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले अन् थेट १९ व्या प्रश्नावर चर्चा करायला सुरुवात केली. यावर जया बच्चन भडकल्या. त्यातच त्या बोलत असताना सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी त्यांना हाताने इशारा करून खाली बसण्यास सांगितले. यावर जया बच्चन यांचा भडका उडाला. आणि त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याजवळ याबद्दल नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

जया बच्चन म्हणाल्या, “जर सभापती व उपसभापती यांनी आम्हाला बसायला सांगितलं तर आम्ही खाली बसू, पण इतर सदस्य जर हाताचे इशारे करून आम्हाला बसायला सांगत असतील तर त्यांचं आम्ही ऐकणार नाही. तुम्ही एखादा मुद्दा नीट मांडला तर ठिके, पण आम्हाला तो नीट समजलाच नसेल तर आम्ही त्यावर प्रश्न विचारणारच. आम्ही काही शाळेतील विद्यार्थी नाही बस म्हंटलं की बसायला. आम्हालाही योग्य तो आदर मिळायला हवा.” जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

प्रश्नोत्तराच्या त्या तासात विरोधी पक्षातील नेत्यांना बोलू न दिल्यानं सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांना बसण्यास सांगितले. यावर जयाजी चांगल्याच भडकल्या. त्या म्हणाल्या की, आम्हाला जर सभापती किंवा उपसभापती यांनी बसण्यास सांगितले तर आम्ही ते ऐकू. पण बाकी कुणी काहीही सांगायला लागले तर ते कसे ऐकणार? तुम्ही जर तुमचा मुद्दा व्यवस्थित सांगितला तर तो समजतो. पण तो नाही समजला तर आम्ही प्रश्न विचारणारच. बस म्हटल्यावर बसायला आम्ही काही शाळेतील विद्यार्थी नाही. आम्हालाही योग्य तो आदर सभागृहात मिळायला हवा,एवढेच आमचे म्हणणे आहे. अशा शब्दांत जया बच्चन यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

उपराष्ट्रपतींच्या टिप्पणीवर सभागृहात हशा

जया बच्चन यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर बोलताना उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी एक मिश्किल टिप्पणी केली. त्यावर सभागृहात हशा पिकला. जयाजी तुम्ही वरिष्ठ सदस्य आहात. तसंही तुम्ही जे बोलता त्याला देशात मान मिळतो. मला माहिती आहे की, तुमच्या सारख्या अभिनेत्रीनं देखील कित्येक रिटेक घेतले असतीलच. त्यावेळी सभागृहात मोठा हशा पिकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -