Pornography Case: राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; चार माजी कर्मचारी झाले साक्षीदार, केले खळबळजनक खुलासे

chargsheet filed against three including raj kundra bollywood shilpa shetty were among 43 witnesses pornography case against raj kundra Porn film case,
Pornography Case: राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; चार माजी कर्मचारी झाले साक्षीदार, केले खळबळजनक खुलासे

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. सतत वाढतच आहेत. पॉर्न फिल्मप्रकरणात राज कुंद्राच्या विरोधात त्याची कंपनी विआनमधील चार माजी कर्मचाऱ्यांनी जबाब दिला आहे. यामुळे एक वेगळी बाजू समोर आली असून आता इथून पुढे राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तातील क्राईम ब्रांचच्या माहितीनुसार राज कुंद्रा विरोधात मोठा पुरावा सापडला आहे. त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांनी कोर्टमध्ये खंडपीठासमोर आपला जबाब दिला आहे. या चार लोकांची माहिती समोर आली आहे. राज कुंद्राची कंपनी विआनमधील हे चार कर्मचारी होते. आता हे चार साक्षीदार राज कुंद्राविरोधातील महत्त्वाचा जबाब देत आहेत आणि क्राईम ब्रांचला तपासणीसाठी मदत करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

पहिला साक्षीदार चार्टर्ड अकाउंटेंट आहे. साक्षीदारने बॅलेन्सशीटमधील सर्व काही माहिती सांगितली आहे. मनी ट्रान्झेक्शनच्या अनेक गोष्टी आता हळूहळू करून समोर येत आहेत. यामुळे मुंबई पोलिसांना मदत होत आहे. दुसरा साक्षीदार खूप महत्त्वाचा आहे. हा साक्षीदार फायनान्स ऑफिसर आहे. याच्यामुळे देशा बाहेरील पैशांची देवाणघेवाण, रिवेन्यू आणि पैशांसंबंधित सर्व काही डाटा समोर आला आहे. उर्वरित दोन साक्षीदार टेक्निकल फील्डचे आहेत. या दोघांनी पोलिसांना कंपनीचे टेक्निकल सपोर्ट, अॅपचे मेंटेनेंस, डाटा डिटेल आणि इतर टेक्निलक इश्यूजबाबत माहिती दिली आहे.


हेही वाचा – अक्षय कुमारच्या चित्रपटातील गाण्याच्या पोस्टरवर चोरीचा आरोप!