घरCORONA UPDATEकनिका कपूरने जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई; १४ दिवस क्वारंटाईनमध्ये रहावं लागणार

कनिका कपूरने जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई; १४ दिवस क्वारंटाईनमध्ये रहावं लागणार

Subscribe

तिला १४ दिवस क्वारंटाईनमध्ये रहावं लागणार आहे. कनिकाच्या पहिल्या चार चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. पण शनिवारी पाचवी चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर आता सहावी चाचणी निगेटिव्ह आली आहे.

कनिका कपूरच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली होती. तिला २० मार्च रोजी लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीजीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, आता कनिका कपूर पूर्णपणे बरी झाली आहे. कनिका कपूरची सलग दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे तिला आता घरी सोडण्यात आलं आहे. मात्र, तिला १४ दिवस क्वारंटाईनमध्ये रहावं लागणार आहे. कनिकाच्या पहिल्या चार चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. पण शनिवारी पाचवी चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर आता तिची सहावी चाचणीही निगेटिव्ह आली आहे आणि तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. कनिकाच्या पाचव्या अहवालानंतर लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआय) चे संचालक प्रोफेसर आर. धीमान यांनी म्हटलं होतं की, “तिची चाचणी निगेटिव्ह आली आहे, परंतु तिची घरी जाण्यापूर्वी आणखी एक चाचणी करू.” दरम्यान ही चाचणी निगेटिव्ह आली आहे.


हेही वाचा – लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्याला केलं गोळ्या घालून ठार!

मात्र, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कनिका कपूरची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनूसार कोरोना विषाणूची लागण झालेली असताना देखील आयसोलेशनमध्ये न राहता शहरातील विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्याबद्दल कनिकावर तीन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. कनिका कपूरविरोधात शहरातील सरोजिनी नगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम १८८, २६९ आणि २७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही एफआयआर दाखल केली गेली. हा जीवघेणा संसर्ग होणारी ही देशातील बॉलिवूडची पहिली सेलिब्रिटी आहे. कनिका कपूर ९ मार्च रोजी लंडनहून मुंबईला परतली. त्यानंतर दोन दिवसांनी ती लखनऊला गेली आणि बर्‍याच पार्ट्यांमध्येही सहभागी झाली, त्यानंतर ही बाब उघडकीस आली.

- Advertisement -

कनिकावर आरोप आहे की परदेशातून परतल्यावर चौकशी न करता ती मुंबई विमानतळावरुन पळून गेली होती. सोशल मीडियावर तिला जोरदार ट्रोल करण्यात आलं होतं. कनिकाला रुग्णालयात दाखल केले असता तिने सांगितलं की डॉक्टर तिला धमकावत आहेत. त्याच वेळी डॉक्टरांनी सांगितले की कनिका उपचारात सहकार्य करत नाही आहे. तथापि, सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आता कनिकाने कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -