घरताज्या घडामोडी'रिया चक्रवर्ती कुठे लपली आहे ते मला माहित आहे', सुशांतच्या वकिलांचा दावा

‘रिया चक्रवर्ती कुठे लपली आहे ते मला माहित आहे’, सुशांतच्या वकिलांचा दावा

Subscribe

'रिया चक्रवर्ती कुठे लपली आहे ते मला माहित आहे', असा दावा सुशांत सिंहचे वकिल विकास सिंहने केला आहे.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळत आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी बिहार पोलीस मुंबईत तपासासाठी आले आहेत. पण, सुशांतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने कुटुंबीयांसोबत पलायन केले आहे. मात्र, ती कुठे गेली आहे, याबाबत कोणालाही माहिती नाही. पण, यादरम्यान सुशांत सिंहचे वकिल विकास सिंहने दावा केला आहे की, ‘रिया कुठे आहे’, हे मला माहित आहे.

पिंकविलाच्या माहितीनुसार; विकास सिंहने सांगितले आहे की, ‘रिया चक्रवती कुठे आहे ते मला माहित आहे. पण, मी याबाबत काही सांगू शकत नाही. तसेच पटना पोलीस तिच्यापर्यंत पोहोचणार देखील नाहीत. कारण सीनियर ऑफिसर आईपीएस विनय तिवारी या प्रकरणाची चौकशी करण्यास आले होते. मात्र, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. तसेच सुरुवातीला जी टीम आली होती, त्या टीमला देखील क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे मी आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे’.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्ती आपल्या कुटुंबियांसोबत घरातून निघून गेली होती. त्यावेळी बिहार पोलिसांनी आरोप केला होता की, रियाने गुपचूप पलायन केले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. तसेच तिला अनेक नोटीस देखील पाठवण्यात आल्या होत्या. या नोटीसमध्ये तिला या प्रकरणाच्या चौकशीकरता सहकार्य करण्याचे सांगण्यात आले होते.


हेही वाचा – सावधान! Netflix तुमचं बँक खातं रिकामं करू शकतं!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -