घरदेश-विदेशगोरखपूर- वांद्रे हमसफर एक्स्प्रेसमध्ये बॉम्बच्या ट्विटमुळे खळबळ

गोरखपूर- वांद्रे हमसफर एक्स्प्रेसमध्ये बॉम्बच्या ट्विटमुळे खळबळ

Subscribe

गोरखपूर -वांद्रे हमसफर एक्स्प्रेसमध्ये ( गाडी क्रमांक 19092 ) बॉम्ब असल्याच्या ट्विटमुळे खळबळ उडाली होती. यावेळी रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा दलाचे जवान बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत ट्रेन थांबवून सर्व डब्यांची कसून तपासणी केली. प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरील डबे तपासल्यानंतर रेल्वे प्रशासन ट्रेनसह वॉशिंग पिटपर्यंत पोहोचले. एकामागून एक उपकरणे आणि जागा तपासणी करण्यात आली. यावेळी घाबरलेले सर्व प्रवासी आपापल्या जागेवर बसून राहिले. कसून चौकशी केल्यानंतर ट्रेनमध्ये काहीही आढळून आले नाही. यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास रेल्वे प्रवाशांसह साडेतीन तास उशिराने धावली.

मिलन राजक नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून रेल्वे मंत्रालय आणि पियूष गोयल यांनी ट्विट

गोरखपूर-वांद्रे हमसफर एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती रेल्वे मंत्रालय आणि पीयूष गोयल यांना मिलन राजक नावाच्या ट्विटर अकाउंटवरून मिळाली. दहशतवादी ट्रेनला बॉम्बने उडवतील. कसून चौकशी केल्यानंतरच गोरखपूरहून ट्रेन सोडा, अन्यथा मोठी दुर्घटना होऊ शकते. आठवडाभर ट्रेन रद्द करा. कृपया वाचवा. असे या ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. दरम्यान रेल्वे मंत्रालयाकडून या ट्विटची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल, शासकीय रेल्वे पोलीस आणि जिल्हा पोलीस सतर्क झाले. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर रात्री 9.30 वाजेपासून सुटणारी गाडी थांबवून तपास सुरू करण्यात आला. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांशिवाय स्थानक व्यवस्थापनही घटनास्थळी पोहोचले.

- Advertisement -

तपासणीसाठी ट्रेन वॉशिंग पिटमध्ये पाठवली

रात्री 11.20 च्या सुमारास ट्रेन वॉशिंग पिटमध्ये कसून तपासणीसाठी पाठवण्यात आली. सुरक्षा दल आणि बॉम्बशोधक पथकाने संबंधित अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने ट्रेनचा तपास सुरू केला.

पियुष गोयल यांनाही ट्विट केले

मिलन राजक अकाऊंटवरून ट्विट करणाऱ्याने पियुष गोयल यांनाही ट्विट केले आहे. मात्र, सध्या ते रेल्वेमंत्री नाहीत. अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्रिपदाची जबाबदारी पाहत आहेत. उद्घोषणा यंत्राद्वारे स्टेशन व्यवस्थापन घाबरलेल्या प्रवाशांना सतत सुचना देत धीर देत राहिले. प्रवाशांनी त्यांच्या नेमून दिलेल्या सीट आणि बर्थवर बसावे, अशी रेल्वेने सुचना केली. तसेच प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ दिली जाणार नाही. कसून चौकशी केल्यानंतर ट्रेन सुटेल. असे स्पष्ट केले.


महापालिका निवडणुका पावसाळ्यानंतरच – राज्य निवडणूक आयोग

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -