Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी धक्कादायक! अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासमोर बॉम्बस्फोट

धक्कादायक! अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासमोर बॉम्बस्फोट

Subscribe

अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासमोर बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. अफगाणिस्तानच्या काबुलमधील परराष्ट्र मंत्रालयासमोर हा बॉम्बस्फोट झाला आहे.

- Advertisement -

रशियातील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाच्या गेटच्या बाहेर स्फोट आणि गोळीबाराचा आवाज ऐकू आला. या महिन्याच्या सुरुवातीलाही काबूलमधील लष्करी विमानतळावर स्फोट झाला होता. अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते नफी तकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत अनेक लोक ठार आणि जखमी झाले आहेत.

काबूलमधील सुरक्षा विभागाचे प्रवक्ते खालिद झद्रान यांनी ट्विट करून परराष्ट्र मंत्रालयाजवळ झालेल्या स्फोटात जीवितहानी झाल्याची माहिती दिली आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचल्याचं देखील झद्रान यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -


हेही वाचा :दिल्ली विमानतळावर प्रवाशाची उघड्यावर लघुशंका; पोलिसांनी ठोकल्या बेड्या


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -