घरक्राइमइंदूरमध्ये स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असताना बॉम्बस्फोट; 2 ठार, 14 जखमी

इंदूरमध्ये स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असताना बॉम्बस्फोट; 2 ठार, 14 जखमी

Subscribe

मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातील इंदूरमधून स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी भीषण बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला असून 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. इंदूरच्या महूच्या बेरछा येथे बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. 15 ऑगस्टच्या तयारीत गावकरी व्यस्त असताना अचानक दोन तरुणांच्या ग्रुपमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. यावेळी गर्दीत कोणातरी बॉम्ब फेकला.

दोन्ही बाजूंनी सुरु असलेला हा वाद वाढत गेला, ज्यात दोन्ही बाजूंनी शिवीगाळ झाली तसेच हाणीमारी देखील झाली, ज्यात अचानक बॉम्बचा स्फोट झाला. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. हा बॉम्ब का आणि कोणी फेकला याचा तपास पोलीस करत आहेत.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच इंदूरचे एसएसपी शशिकांत कांकणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गटातील आपापसात झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे. हा वाद वाढताच एका बाजूने कोणीतरी बॉम्ब फेकला आणि ज्याचा स्फोट झाला. यात दोघांचा मृत्यू झाला असून डझनभर लोक जखमी झाले आहेत.

- Advertisement -

15 ऑगस्टच्या तयारीत व्यस्त असताना झाला स्फोट

बेरछा गावातील ग्रामस्थ 15 ऑगस्टच्या तयारीत व्यस्त होते. यादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर दोन्ही बाजू समोरासमोर आल्या. त्यानंतर एक तरुण तेथे बॉम्ब घेऊन पोहोचला आणि त्याने तो जमावामध्ये फेकला. बॉम्बचा स्फोट करणारा तरुणाचाही यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या बॉम्बचा स्फोट झाला तो लष्कराच्या फायरिंग रेंजमध्ये सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कारण स्फोट इतका जोरदार होता की आजूबाजूच्या गावातही घबराट पसरली. हा बॉम्ब तरुणाकडे कसा आला, याचा तपास आता पोलीस करत आहेत.


… तर हे सरकार गडगडेल; अजित पवारांचं मोठं विधान


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -