घरदेश-विदेशBomb Blast In Kabul : अफगाणिस्तानची राजधानी काबुल बॉम्ब स्फोटांनी हादरली; ...

Bomb Blast In Kabul : अफगाणिस्तानची राजधानी काबुल बॉम्ब स्फोटांनी हादरली; शाळांमध्ये झालेल्या स्फोटात 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Subscribe

तालिबान्यांनी काबीज केलेल्या अफगाणिस्तानमध्ये आता इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना सक्रिय झाली आहे. या दहशतवादी संघटनेकडून शिया समुदायाला लक्ष्य केले जाते.

अफगाणिस्तानची राजधानी काबूल मंगळवारी (19 एप्रिल) बॉम्ब स्फोटांच्या मालिकांमुळे हादरली आहे. काबुलमधील एका शाळेत एकामागून एक तीन बॉम्ब स्फोट झाले. या स्फोटात आत्तापर्यंत 25 हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील पहिला स्फोट मुमताज एॅज्युकेशन सेंटरजवळ झाला तर दुसरा स्फोट अब्दुल रहीम शहीद हाय स्कुलसमोर झाला आहे. या स्फोटाच्या वेळी या शाळांमधून विद्यार्थी घरी जाण्यासाठी बाहेर पडत होते. अब्दुर रहीम शाहिद हायस्कूलवर तीन ते पाच आत्मघातकी हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यापैकी दोन बॉम्बचा स्फोट झाला आहे. हा स्फोट झाला तेव्हा अनेक विद्यार्थी वर्गात होते.

घटनास्थळी उपस्थित शिक्षकाच्या माहितीनुसार, या स्फोटात आत्तापर्यंत 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर अनेक विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मंगळवारी सकाळी पश्चिम काबुलमधील दश्त-ए-बरची भागात हे दोन स्फोट झाले. आत्तापर्यंत कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. परंतु आजपर्यंत अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या स्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेट घेत आलं आहे. मात्र हा ‘आत्मघातकी बॉम्ब’ हल्ला असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

तालिबान्यांनी काबीज केलेल्या अफगाणिस्तानमध्ये आता इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना सक्रिय झाली आहे. या दहशतवादी संघटनेकडून शिया समुदायाला लक्ष्य केले जातेय. शिया मुस्लीम समाजाच्या मशीदींवर हल्ले केले जात आहे. मात्र तालिबान सरकारकडून या हल्लांना रोखण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही अफगाणिस्तानच्या अनेक भागांत सातत्याने दहशतवादी हल्ले सुरुच आहेत. इस्लामिक स्टेट संघटना अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेट स ऑफ खुरासान प्राविंस नावाने सक्रिय आहे. या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले सुरु आहेत.


Elon Musk Vs Twitter : ट्विटर माझ्या हातात आले तर पगार शून्य करेन; एलन मस्कची मोठी धमकी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -