घरताज्या घडामोडीPakistan Blast: पाकिस्तानच्या लाहौर शहरात स्फोट, ३ जणांचा मृत्यू तर अनेक जण...

Pakistan Blast: पाकिस्तानच्या लाहौर शहरात स्फोट, ३ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

Subscribe

पोलिसांच्या माहितीनुसार धमाका करण्यासाठी पहिल्यापासूनच बॉम्ब घटनास्थळी ठेवण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळाला घेराव घातला आहे. परंतु हा आयईडी बॉम्ब होता की टाइम बॉम्ब होता याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही.

पाकिस्तानमधील लाहौर शहरात लोहारी गेटजवळ जोरदार स्फोट झाला आहे. या स्फोटात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. या स्फोटातील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृतांमध्ये एक लहान मुलग्याचा समावेश आहे. धमाका एवढा जोरदार होता की, आजूबाजूला असणाऱ्या इमारतींचे आणि दुकानांच्या काचांना तडे जाऊन काचा फुटल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोट झालेल्या ठिकाणी १.५ फूट खोल खड्डा झाला आहे. स्फोटातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक स्फोट झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

पाकिस्तानमधील लाहौरमध्ये जोरदार स्फोट झाला आहे. या स्फोटाची भीषणता तीव्र आहे. लाहौरमधील लोहारी गेटजवळ लोकांची रहदारी अधिक आहे. या ठिकाणी मुख्य बाजारपेठ असल्यामुळे लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच या परिसरात अनेक व्यापाऱ्यांच्या आणि उद्योजकांची कार्यालये आहेत. स्फोटानंतर पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

स्फोटात जखमी झालेल्यांना पाकिस्तानच्या मायो रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. परंतु सर्व जखमींना तातडीने उपचार देण्यात येत असून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करण्यात येतील असे लाहौरचे उप महानिरीक्षक डॉ. मुहम्मद आबिद खान यांनी म्हटलं आहे.

लाहौर ऑपरेशनचे महानिरीक्षक, डॉ मुहम्मद खान यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, सध्या प्राथमिक चौकशी सुरु करण्यात आली आहे. पंरतु लवकरच या स्फोटामागील कारणाचा शोध घेण्यात येईल. तसेच पोलिसांच्या माहितीनुसार धमाका करण्यासाठी पहिल्यापासूनच बॉम्ब घटनास्थळी ठेवण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळाला घेराव घातला आहे. परंतु हा बॉम्ब आयईडी बॉम्ब होता की टाइम बॉम्ब होता याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही.

- Advertisement -

जूनमध्ये सिलेंडर स्फोट

पाकिस्तानच्या लाहौरमध्ये जून महिन्यात सिलेंडर स्फोट झाले होते. एखाद्या साखळी स्फोटासारखे सिलेंडरचा स्फोट होत होता. एक-एक करुन अनेक सिलेंडरचा यावेळी स्फोट झाला आणि यामध्ये एक व्यक्ती जळून जखमी झाली होती. एक एक सिलेंडरचा स्फोट होत असल्यामुळे बचाव कार्य करण्यात आपत्ती विभागाला अडचणी येत होत्या.


हेही वाचा : Delhi Riot Case : दिल्ली दंगल प्रकरणात पहिली शिक्षा, हिंसाचाराप्रकरणी आरोपीला ५ वर्षाचा तुरूंगवास

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -