घरताज्या घडामोडीJammu-Kashmir Blast: जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये स्फोट, १ ठार तर १३ जण जखमी

Jammu-Kashmir Blast: जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये स्फोट, १ ठार तर १३ जण जखमी

Subscribe

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील स्लाथिया चौकात आज बुधवारी स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. स्फोटाच्या या घटनेनंतर परिसरात तणावाचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाले होते. बॉम्बशोधक पथक आणि एफएसएल पथक घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका भाजी विक्रेत्याच्या गल्लीत झाला. केंद्रीय मंत्री आणि उधमपूरचे खासदार डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यातील तहसील कार्यालयाजवळील रस्त्यावरील स्टॉलमध्ये झालेल्या स्फोटात १३ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी डीसी इंदू चिब यांच्या संपर्कात आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती उधमपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी सांगितले आहे.

स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा आवाज ५० ते १०० मीटरपर्यंत ऐकू आला. घटनास्थळाजवळील रस्त्यावरील विक्रेत्यांसह प्रत्यक्षदर्शींची पोलीस चौकशी करत आहेत. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हा स्फोट डिटोनेटरमुळे किंवा फळे पिकवण्यासाठी वापरण्यात आलेल्या रसायनामुळे झाला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

तीन दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला

याआधी ६ मार्चच्या संध्याकाळी श्रीनगरच्या अमीराकदल भागातील रविवारच्या बाजारात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर २३ जण जखमी झाले. जखमींमध्ये १७ महिलांचा समावेश होता. रविवारच्या बाजारात तैनात असलेल्या सुरक्षा दलांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला होता, तो रस्त्यावर पडला. ग्रेनेडमधून बाहेर उडालेले तुकडे लोकांवर उडाले होते.


हेही वाचा : BJP Protest: दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांनी सत्तेत राहू नये – सुधीर मुनगंटीवार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -