उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून योगी यांना धमकी देण्यात आली आहे. या मेसोजमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यावर बॉम्बने हल्ला करून त्यांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून योगी यांना धमकी देण्यात आली आहे. या मेसोजमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यावर बॉम्बने हल्ला करून त्यांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देताना आरोपीने आपले नाव सांगितले आहे. त्यानुसार, शाहिद असे आरोपीचे नाव आहे. (bomb blast man give death threat to cm yogi aditynath in WhatsApp message with dial 112 in Lucknow)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या मुख्यालयाच्या 112 या व्हॉट्सअॅप नंबरवर एक मेसेज आला होता. त्यामध्ये योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा नंबर शाहिद खान नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, आरोपीने योगी आदित्यनाथ यांच्यावर 3 दिवसात हा हल्ला करणार असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, एजन्सींनी तपासालाही सुरूवात केला आहे.

या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलीस यंत्रणा सतर्क झाले असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान व्हॉटस्ॲप नंबरच्या आधारे पोलीस आरोपीचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याप्रकरणी लखनऊच्या गोल्फ सिटी ठाण्यात आरोपी शाहिद खानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पोलिसांना अधिक तपास केला असता लवकरच आरोपीला पकडण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांना दिलेल्या धमकीच्या मेसेजचा स्क्रीन शॉटही गुप्तचर यंत्रणांना दिला आहे. त्यामुळे आता आरोपील पोलीस अटक करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा –  बिहारमध्ये जेडीयू- बीजेपी युती अखेर तुटली; जेडीयू- आरजेडीसोबत स्थापन करणार नवं सरकार